
amul milk
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना हैरान केलं असतानाच आता दुधाला या महागाईचा फटका बसला आहे. गुजरात डेअरी सहकारी समुहाने अमूलने दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. (Amul Milk New Rate) दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. नवीन किमती तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. आता नवीन दरपत्रकानुसार, अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश 54 रुपये प्रति लीटर, अमूल गायीचे दूध 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीच्या दुधासाठी 70 रुपये प्रति लीटर मोजावे लागतील.
[read_also content=”सामान्य नागरिक सोडा पाकिस्तानातील ‘या’ भागात तर लष्करही राहतं दहशतीत! 15 वर्षांपासून ‘या’ संघटनेनं आणले नाकी नऊ https://www.navarashtra.com/world/pakistani-military-feel-helpless-in-khyber-pakhtunkhwa-as-there-is-ttp-is-so-powerful-nrps-366907.html”]
अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी दरवाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकट्या पशुखाद्याचा खर्च सुमारे २० टक्क्यांनी वाढला आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन आमच्या सभासद संघटनांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या किमतीत ८ ते ९ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याच वेळी, डिसेंबरमध्ये मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (जीसीएमएमएफ) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दूध दरवाढ गुजरातमध्ये लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. नवे दर मुंबई, कोलकाता आणि दिल्ली इतर बाजारांसाठी आहेत. जीसीएमएमएफने एका निवेदनात म्हटले आहे की नवीन किमती शुक्रवारी सकाळपासून लागू होतील.