Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणखी एका भाजप नेत्याची राजकारणापासूनच फारकत; माजी मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर मोठी भूमिका

भाजपने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये काही जणांचे तिकीट कापण्यात आले. परंतु, आता एकामागोमाग एक भाजपचे खासदार आणि नेते थेट राजकारणापासूनच निवृत्ती घेत आहेत. दिल्लीतील चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून माजी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी थेट राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 03, 2024 | 07:59 PM
After cutting the ticket for the Lok Sabha, former Health Minister Dr. Harsh Vardhan's Ram-Ram for politics

After cutting the ticket for the Lok Sabha, former Health Minister Dr. Harsh Vardhan's Ram-Ram for politics

Follow Us
Close
Follow Us:

Health Minister Dr. Harsh Vardhan : भाजप नेते एकामागोमाग एक भाजप नेते राजकारणापासूनच फारकत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीमधील चांदणी चौकचे खासदार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणाला राम राम ठोकून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शनिवारी भाजपाने दिल्लीतील पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये चांदणी चौक येथून प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट देण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले

डॉ. हर्षवर्धन हे याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले होते. आपल्या एक्स अकाऊंवर भली मोठी पोस्ट लिहून डॉ. हर्षवर्धन यांनी या निर्णयाची माहिती दिली. तसेच राजकारणातून बाजूला झाल्यानंतर पूर्व दिल्लीच्या कृष्णा नगर भागात असलेल्या आपल्या दवाखान्यावर लक्ष देणार असून कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सरकारमध्ये महत्त्वाची पदे भूषविण्याची संधी

डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या दीर्घ पोस्टमध्ये लिहिले की, तीस वर्ष माझी अतिशय सुरेख अशी राजकीय कारकिर्द राहिली. पाच वेळा विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा निवडणुकीत मला मोठ्या फरकाने लोकांनी जिंकून दिलं. या काळात पक्षात आणि सरकारमध्ये महत्त्वाची पदे भूषविण्याची संधी मला मिळाली. आता मी यातून बाहेर पडत असून पुन्हा एकदा माझ्या मूळ कामाला मी जात आहे.

आरएसएसच्या आग्रहामुळे मी राजकारणात

डॉ. हर्षवर्धन पुढे लिहितात, कानपूरच्या जीएसव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी गरिबांना आणि गरजूंना मदत करणे, हेच माझे ध्येय ठेवले. तत्कालीन राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील नेतृत्वाच्या आग्रहामुळे मी राजकारणात प्रवेश केला होता.

मी शेवटपर्यंत संघ कार्यकर्ता

“मी एक स्वंयसेवक आहे. शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचली पाहीजे, या पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या अंतोदय तत्त्वज्ञानाने भारावून जात आजवर मी कार्यरत राहिलो. तेव्हाच्या आरएसएसच्या नेत्यांनी मला राजकारणात येण्याची समजूत घातली, म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो. राजकारण म्हणजे आपल्या तीन प्रमुख शत्रूंशी लढण्याचे एक साधन आहे, अशी माझी समजूत घालण्यात तेव्हा ते नेते यशस्वी ठरले. गरीबी, रोग आणि अज्ञान हे मानवाचे तीन प्रमुख शत्रू आहेत, असे मी मानतो”, अशी भावना डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली.

कोण आहेत प्रवीण खंडेलवाल?

डॉ. हर्षवर्धन यांच्या ऐवजी ज्यांना उमेदवारी दिली, ते प्रवीण खंडेलवाल हे व्यावसायिक असून अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) ते सरचिटणीस आहेत. खंडेलवाल यांनी जीएसटी परिषदेतही काम केलेले आहे. विदेशी ई-कॉमर्स कंपन्यामुळे स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांना नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी मधल्या काळात उचलून धरला होता. भाजप दिल्लीचे ते माजी खजिनदारही राहिले आहेत.

Web Title: Another bjp leader took a break from politics former health minister dr harsh vardhan took an extreme stance after cutting lok sabha ticket nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2024 | 07:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.