'डिजिटल स्ट्राईक' करत व्हॉट्सअॅप युजर्सना सरकार देणार झटका;
नवी दिल्ली : सध्या व्हॉट्सॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात कंपनीकडून आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक खास फीचर आणले जात आहेत. याचा फायदाही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. असे असताना आता सरकारकडून ‘डिजिटल स्ट्राईक’ची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतच तब्बल 59000 अकाउंट बंद करण्यात आली आहेत.
हेदेखील वाचा : श्रीहरिकोटाहून ISROच्या रॉकेटद्वारे युरोपियन सूर्य निरीक्षण उपग्रह ‘प्रोबा-3’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयफोरसी या संस्थेने सायबर गुन्हे रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या संस्थेने 1700 पेक्षा जास्त स्काईप अकाउंट आणि 59000 पेक्षा जास्त व्हॉट्सॲप अकाउंट ब्लॉक केली आहेत. ब्लॉक करण्यात आलेली अकाउंट ही फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरली जात होती. त्यामुळे हा कारवाईचा बगडा उगारण्यात आला आहे.
दरम्यान, २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम’च्या मदतीने ९.९४ लाखांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून, ३४३१ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान टाळण्यात आले आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर (सीएफएमसी) हे नवीन केंद्र तयार केले आहे.
…म्हणून उचलण्यात आलं कारवाईचं पाऊल
सायबर गुन्ह्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत ही माहिती दिली. याशिवाय
गुन्हेगारी वृत्तीला आळा बसवण्यासाठी मजबूत यंत्रणा
डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकार आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांनी (टीएसपी) इनकमिंग आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ओळखण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे असे नंबर ब्लॉक केले जाऊ शकतात आणि भारतीय मोबाईल नंबर दाखवणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स रोखले जाऊ शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे रोखले जाऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हेदेखील वाचा : प्रत्येक वेळी एक कठोर बाप किंवा आई असणे गरजेचे नाही, मुलांवर होऊ शकतो वाईट परिणाम