83668 व्हॉटसअॅप खाती बंद
नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्हॉट्सअॅप , इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), मेटा (फेसबुक) यांसारख्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. त्यातच व्हॉट्सअॅप चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. असे असताना आता तब्बल 83668 व्हॉट्सअॅप अकाउंट्स ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
‘सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर’ (14C) ने डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 3962 हून अधिक स्काईप आयडी आणि 83668 व्हॉटसअॅप अकाउंटची ओळख पटवली आहे आणि ते ब्लॉक केले असल्याची माहिती गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत दिली. आय4सी ही सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाची एक विशेष शाखा आहे.
हेदेखील वाचा : Samsung Galaxy Book 5 series: साउथ कोरियन ब्रँडचा लेटेस्ट लॅपटॉप लाइनअप भारतात लाँच, AI फीचर्स आणि 25 तास चालणारी बॅटरी
द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) या पक्षाचे खासदार तिरुची शिवा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गृह राज्यमंत्री संजय बंदी कुमार यांनी ही लेखी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘सायबर गुन्हेगारांनी ईडी, सीबीआयसारख्या एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करण्यासाठी या खात्यांचा वापर केला.
7.81 लाखांहून अधिक सिम कार्डही ब्लॉक
याशिवाय, 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत 7.81 लाखांहून अधिक सिम कार्ड आणि 2.08 लाखांहून अधिक आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याच वेळी, 13.36 लाखांहून अधिक तक्रारींच्या आधारे, 4386 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे नुकसान टाळता आले.
स्पूफ कॉल ओळखण्यासाठी सिस्टम सज्ज
गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टीएसपी) आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. जेव्हा असे कॉल येतात तेव्हा मोबाईलवर भारतीय नंबर दिसतो, जरी तो कॉल परदेशातून येत असला तरी. टीएसपींना असे कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : OPPO Reno 13: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे ओप्पो स्मार्टफोनचं नवीन एडीशन, 12GB रॅम आणि स्पेशल फीचर्सने सुसज्ज