OPPO Reno 13: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे ओप्पो स्मार्टफोनचं नवीन एडीशन, 12GB रॅम आणि स्पेशल फीचर्सने सुसज्ज
स्मार्टफोन कंपनी OPPO ने जानेवारीमध्ये भारतात OPPO Reno 13 स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने OPPO Reno 13 आणि Reno 13 Pro या स्मार्टफोन्स लाँच केले आहे. OPPO Reno 13 स्मार्टफोन सिरीज ही Reno 12 लाइनअपचे उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आली होती. आता कंपनीने या स्मार्टफोन सिरीजमध्ये एक नवीन कलर व्हेरिअंट अॅड केला आहे. OPPO Reno 13 स्मार्टफोन आता एका नवीन रंगात सर्वांच्या भेटीला आहे.
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांची SpaceX सोबत पार्टनरशिप, लवकरच सुरु केली जाणार Starlink ची सेवा
OPPO कंपनीने OPPO Reno 13 स्मार्टफोन स्काय ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. रंग पर्याय, रॅम आणि स्टोरेज व्यतिरिक्त, कंपनीने या स्मार्टफोनच्या हार्डवेअरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच OPPO Reno 13 स्मार्टफोन काही नवीन बदलांसह तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर देखील एक टीझर शेअर केला आहे. स्मार्टफोनच्या नवीन बदलांबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
OPPO Reno 13 स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिअंट 12GB + 512GB आणि 8GB + 256GB या दोन स्टोरेज पर्यायात लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत भारतात 43,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. स्मार्टफोनचा नवीन रंग अधिक आकर्षक आहे. या नवीन रंगामुळे स्मार्टफोन अधिकच स्टायलिश दिसत आहे. स्मार्टफोनच्या या नवीन व्हेरिअंटची विक्री 20 मार्चपासून फ्लिपकार्ट, OPPO ई-स्टोर आणि कंपनीच्या रिटेल आउटलेटवर सुरू होईल. ओप्पोचा हा मॉडेल भारतात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 37,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.
A shade as limitless as your moments. Introducing #OPPOReno13Series in Sky Blue—because the best memories are made under open skies. ✨.#OPPOReno13SkyBlue #LiveInTheMoment #OPPOAIPhone
Know more: https://t.co/McjS5ImJbd pic.twitter.com/rcOwoVse5B
— OPPO India (@OPPOIndia) March 10, 2025
OPPO Reno 13 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा 1.5K मायक्रो-कर्व्हड AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. या फोनचा डिस्प्ले Corning Gorilla Gass 7i प्रोटेक्शनला सपोर्ट करतो.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP Sony LYT600 OIS लेन्स आहे, ज्यासोबत 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मोनोक्रोम लेन्स देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे.
OPPO Reno 13 स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G615 GPU सह MediaTek Dimensity 8350 चिपसेट देण्यात आला आहे. हा ओप्पो फोन Android 15 वर आधारित ColorOS 15 वर चालतो.
फोनमध्ये 5600mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, यात 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C पोर्ट आहे.