Rahul Gandhi News: गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना थेट आरोप करताना दिसत आहे. बिहार असो वा महाराष्ट्र असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ते थेट विरोधी नेत्यांना थेट भिडताना दिसत आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमधील नेत्यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्यावर तोफ डागली आहे. आसाममधील चायगाव येथे बोलताना त्यांनी सरमा यांच्यावर निशाणा साधला. एका बाजूला आरएसएसकडे द्वेष, फूट आणि भांडणाची विचारसरणी आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडे द्वेष नष्ट करण्याची विचारसरणी आहे. यावेळी त्यांनी सांगितले की आसामचे मुख्यमंत्री तुरुंगात जातील, अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
राहुल गांधी म्हणाले, “आज आसाममध्ये जे घडत आहे ते संपूर्ण देशात घडत आहे. येथील मुख्यमंत्री स्वतःला राजा मानतात, पण जेव्हा तुम्ही त्यांचा आवाज ऐकता, त्यांच्या डोळ्यात पाहता तेव्हा तुम्हाला त्यामागील भीती दिसेल. ते मोठ्याने बोलतात, ओरडतात, पण त्यांच्या मनात भीती असते. कारण त्यांना माहित आहे की एके दिवशी काँग्रेसचा बब्बर सिंह त्यांना तुरुंगात टाकेल. त्यांना त्यांच्या सर्व भ्रष्टाचाराचे उत्तर आसामच्या लोकांना द्यावे लागेल.” पंतप्रधान मोदीही हिमंता बिस्वा सरमा यांना वाचवू शकणार नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “मी जे बोलतो ते घडते. कोविड, नोटाबंदी, चुकीच्या जीएसटी दरम्यान मी जे बोललो त्याचे परिणाम संपूर्ण देशाला दिसले. मी आज सांगत आहे की थोड्याच दिवसांत तुमच्या मुख्यमंत्री तुरुंगात जाताना दिसेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा हेदेखील त्यांना वाचवू शकणार नाहीत. काँग्रेस पक्ष हे करणार नाही. तरुण, शेतकरी, कामगार आणि आसाममधील प्रत्येक वर्गातील लोक हे करतील कारण त्यांना माहित आहे की ही व्यक्ती भ्रष्ट आहे. ही व्यक्ती २४ तास आसामची जमीन चोरत आहे. कधी सोलर पार्कच्या नावाखाली, कधी रिसॉर्टच्या नावाखाली आणि आसाममधील प्रत्येक मुलाला, प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे.
राहुल गांधींच्या विधानावर हिमंता बिस्वा सरमा यांनीदेखील त्यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. ”राहुल गांधी आसाममध्ये येतात आणि मला तुरुंगात पाठवण्याची भाषा करतात पण ते स्वतः जामिनावर आहेत हे विसरतात. ट्विटर एक्सवर पोस्ट करताना हिमंता बिस्वा सरमा यांनी लिहीलं आहे की, “हे लिहून घ्या, हिमंता बिस्वा सरमा यांना नक्कीच तुरुंगात पाठवले जाईल – हे तेच वाक्य आहे जे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आसाममधील काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीसोबतच्या बैठकीत म्हटले होते, परंतु आमचे नेते किती सहजपणे विसरले की ते स्वतः देशभरात दाखल असलेल्या अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जामिनावर आहेत. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत, राहुल जी. आज आसामच्या आदरातिथ्याचा आनंद घ्या.” अशा शब्दांत सरमा यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासा; मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केलं गायब
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी बिहारमधील मतदार यादी सुधारणेबद्दल म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुका भाजप आणि निवडणूक आयोगाने चोरल्या. बिहारमध्येही तेच करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लोक आता बिहारमध्ये नवीन मतदार यादी तयार करत आहेत. लाखो लोकांना त्या मतदार यादीतून काढून टाकले जात आहे. त्यात गरीब, कामगार, शेतकरी आणि काँग्रेस-राजद मतदारांचा समावेश आहे. आम्ही बिहारमध्ये याचा निषेध करत आहोत आणि त्यांच्यावर दबाव आणत आहोत. हे लोक आसाममध्येही असेच करतील, परंतु आम्ही हे होऊ देणार नाही.”