Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत ATS ची एन्ट्री; डीव्हीआर जप्त अन्...
अहमदाबाद: अहमदाबाद येथे काल झालेल्या विमान दुर्घटनेत 240 पेक्षा जातस लोकांचा जीव गेला आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान हा अपघात नक्की कशामुळे झाला, याचे कारण आता तपासातूनच समोर येणार आहे. दरम्यान या घटनेत आता दहशतवाद विरोधी पथका (ats) ची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या घटनेचा तपास वेगवान पद्धतीने सुरू झाला आहे.
अहमदाबाद एटीएसने आज अपघात झालेल्या घटनास्थळी तपास सुरू केला आहे. एटीएसने या घटनेतील डीव्हीआरदेखील जप्त केला आहे. गुजरात एटीएसने अहमदाबाद विमान अपघाताची पाहणी केली. यावेळी एटीएसच्या पथकाने घटनास्थळावरून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्ड जप्त केला आहे.
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाचा तपास आता गुजरात एटीएसकडे देण्यात आला आहे. हा नक्की अपघात आहे घातपात या दृष्टीने देखील याचा तपास केला जाणार आहे. एटीएसने डीव्हीआर जप्त केला आहे. तर फॉरेन्सिक टीमने देखील घटणस्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.
#WATCH | Gujarat ATS recovered a Digital Video Recorder (DVR) from the debris of the Air India plane that crashed yesterday in Ahmedabad. An ATS personnel says, "It's a DVR, which we have recovered from the debris. The FSL team will come here soon." pic.twitter.com/zZg9L4kptY — ANI (@ANI) June 13, 2025
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघनीनगर येथे जाऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. हा अपघात कशामुळे घडला याचा तपास वेगाने सुरू झाला आहे. या घटनेट विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये केवळ एकच व्यक्ती सुदैवाने बचावला आहे.
अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान कोसळले. उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळले. हे विमान लष्कराच्या कॅन्टोन्मेंटच्या जवळपास कोसळल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय? आर्मी अलर्ट तर ATS घटनास्थळी दाखल
हा अपघात झाल्यानंतर आता लष्कर देखील सतर्क झाले आहे. ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा कट तर नव्हता अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) दाखल झाले आहे. तसेच शीघ्र कृती दल, रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत.
अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेवर PM नरेंद्र मोदीचे ट्वीट
अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.