
Attacker reveals he trying to kill former Jammu and Kashmir CM Farooq Abdullah for the last 20 years
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक देखील होते. मात्र त्यांच्याच सोबत चालत असलेल्या घोळक्यामधून हल्ला करण्यात आला. कमल सिंग जामवाल असे हल्लेखोराते नाव आहे. जवळच असलेल्या सुरक्षा रक्षकाने 63 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस करत असून हल्लेखोराची कसून चौकशी केली जात आहे.
हे देखील वाचा : जम्मूत फारूख अब्दुल्लावर गोळीबार, लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते माजी मुख्यमंत्री
फारुख अब्दुल्लांवर हल्ला करणारा हल्लेखोर कमल सिंग जामवाल याने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. तो म्हणाला की, “माझ्याकडे असणाऱे अग्निशस्त्र हे माझेच आहे. या शस्त्राचा माझ्याकडे परवाना देखील आहे. गेल्या 20 वर्षांपासून मी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करतोय. हा माझा वैयक्तिक अजेंडा आहे. दैव बलवत्तर म्हणून ते काल वाचले,” असा खुलासा हल्लेखोर कमल सिंग जामवाल याने केला आहे.
#BigBreaking एक शादी समारोह में Farooq Abdullah पर फायरिंग, बाल-बाल बचे। उस वक्त डिप्टी सीएम Surinder Choudhary भी साथ थे। हमलावर कमल सिंह जामवाल गिरफ्तार। सवाल उठता है—जब पूर्व मुख्यमंत्री ही सुरक्षित नहीं, तो आम जनता की सुरक्षा किस भरोसे? #Jammu #FarooqAbdullah pic.twitter.com/a6M4QH6eyL — Ashfaq Joiya (@ashpak_Hussain7) March 11, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर लग्न समारंभामध्ये हल्ला झाला. या जीवघेण्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. यामध्ये त्यांच्यासोबत चालत असलेल्या व्यकीनेच गोळीबार केला असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मात्र गोळी त्यांना छाटून गेली. यावेळी आसपास असलेल्या लोकांनी हल्लेखोराची धरपकड केली. तसेच या घटनेवेळी जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील त्यांच्यासोबत होते. सुरिंदर चौधरी यांना शस्त्रांच्या तुकड्यांमुळे किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना देखील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
हे देखील वाचा : स्टेशनांवरून वडा-समोसा होणार गायब! एलपीजीच्या तुटवड्याचा परिणाम; शिवडी आणि कुर्ल्यातील क्लाऊड किचन बंद