अयोध्येत अत्याचारानंतर तरुणीची विकृत पद्धतीने हत्या; घटना सांगताना खासदाराला रडू कोसळलं
अयोध्येत एका तरुणीवर अत्याचार करून अतिशय विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडली आहे. तरुणीच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या प्रकाराचा घटनाक्रम सांगताना अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पत्रकार परिषेदत ढसा ढसा रडले.
अयोध्येत घडलेल्या प्रकारानंतर खासदार अवधेश प्रसाद यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं. तरुणीला न्याय मिळाला नाही, तर राजीनामा देऊ, असा इशारा खासदार प्रसाद यांनी दिला. खासदार प्रसाद भर पत्रकार परिषदेत धाय मोकलून रडले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
#WATCH | SP MP Awadhesh Prasad breaks down as he addresses a press conference on the incident wherein the body of a girl, who was missing for 3 days, was found in a field in Ayodhya.
He says, “Let me go to Lok Sabha, I will speak with PM Modi. If justice is not served, I will… pic.twitter.com/8SvPUYaArR
— ANI (@ANI) February 2, 2025
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, ‘अयोध्येत दलित तरुणीसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अयोध्येत दलित तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवस तिच्या कुटुंबीयांनी मदतीची याचना केली. प्रशासनाने तिच्या कुटुंबीयाकडे मागणीकडे लक्ष दिलं असतं, तर तिचा जीव वाचला असता. देशात आणखी एका तरुणीचा अंत झाला आहे. आणखी किती कुटुंबाना जाच सहन करावा लागेल?’
राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, ‘बहुजन विरोधी भाजपच्या राज्यात विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर अत्याचार, अन्याय होत आहे. त्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहेत. दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलले पाहिजे. त्यांनी पीडित कुटुंबाला नेहमीप्रमाणे त्रास देऊ नये. देशातील तरुणी आणि संपूर्ण दलित समाज न्याय मागत आहे’, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.
अयोध्येत तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेच्या विरोधात राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी गुरुवारी रात्री १० वाजता धार्मिक कार्यक्रमाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, तरुणी पुन्हा घरी परतलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तीन दिवसांनी तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला. तिचे डोळे काढले होते. हात-पाय दोरीने बांधले होते. चेहरा आणि कपाळावर गंभीर जखमा होत्या. तिच्या शरीराचे हाडे मोडली होती. तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.