Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अयोध्या राम मंदिर देशासाठी ऊर्जेचे स्रोत ठरणार; रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे सदभाव, समन्वयाचे प्रतीक, वाचा नरेंद्र मोदींनी काय केले विराट वर्णन

राम मंदिर सोहळ्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यावर मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये प्रभू श्रीरामचंद्र भारतासाठी काय आहेत, याचे विराट वर्णन केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

  • By युवराज भगत
Updated On: Jan 22, 2024 | 05:33 PM
अयोध्या राम मंदिर देशासाठी ऊर्जेचे स्रोत ठरणार; रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे सदभाव, समन्वयाचे प्रतीक, वाचा नरेंद्र मोदींनी काय केले विराट वर्णन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राम मंदिराचे उद्घाटन झाले असून, प्रभू श्रीराम आज विराजमान झाले आहेत. देशातील रामभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाजाच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक विधी पार पडला. यावेळी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा विधी पूर्ण करण्यात आला. यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये प्रभूरामचंद्र यांचे विराट वर्णन केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा बोध आहे. आजचा क्षण विजयाचा नाही तर विनयाचाही आहे. अनेक राष्ट्र इतिहासात गुरफुटून जातात. त्यांनी इतिहास उलगडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातून अडचणी आल्या. पण, आपण इतिहासाची ही गाठ अत्यंत भावूकतेने सोडली आहे. आपले भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा अधिक सुंदर होणार आहे. राम मंदिर बनले तर आग लागेल, असे काही लोक म्हणत होते. पण, या लोकांना भारताच्या सामाजिक भावाची पवित्रता माहितीच नव्हती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

राम वाद नाही, समाधान
रामलल्लाच्या मंदिराची निर्मिती सदभाव, समन्वयाचे प्रतीक आहे. भारतीय समाजाची एकरुपता आहे. हे नवनिर्माण आगीला नव्हे तर ऊर्जेला जन्म देत आहे, हे आपण पाहत आहोत. भारतीय समाजाला उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या लोकांना मी आाहन करतो, या पुनर्विचार करा. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, ते सर्वांचे आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काल आहे.

राम भारताची आस्था, प्रतिष्ठा
मंदिर फक्त देवाचं मंदिर नाही. तर भारताच्या दृष्टीचे भारताच्या दर्शनाचे मंदिर आहे. हे रामाच्या रुपातील राष्ट्र चेतनेचं मंदिर आहे. राम भारताची आस्था आहे. राम भारत आधार आहे. राम भारताचा विचार आहे, राम भारताची चेतना आहे, चिंतन आहे. प्रतिष्ठा आहे, प्रताप आहे. प्रवाह आहे, प्रभावही आहे. राम नेती आहे, निती आहे. राम नित्यता आहे. राम निरंतर आहे. राम व्यापक आहे. राम विश्व आहे. राम विश्वात्मा आहे. जेव्हा रामाची प्रतिष्ठा होते तेव्हा त्याचा प्रभाव वर्षभरासाठी नसतो तर हजारो वर्षासाठीचा असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Web Title: Ayodhya ram temple will be a source of energy for country ramlallas pranapratistha is a symbol of harmony narendra modi described lord rama as a great figure nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2024 | 05:33 PM

Topics:  

  • Prime Minister Narendra Modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.