SIMI वर पाच वर्षांची बंदी वाढवली, गृह मंत्रालयाने जारी केला आदेश
केंद्रीय गृहमंत्रालयाने 'स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) वरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी (29 जानेवारी) X वर एका पोस्टद्वारे ही बंदी वाढवण्याच्या आदेशाची माहिती शेअर केली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) वरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी (29 जानेवारी) X वर एका पोस्टद्वारे ही बंदी वाढवण्याच्या आदेशाची माहिती शेअर केली. (Home Ministry Of India extended ban on SIMI for five years under UAPA )
गृह मंत्रालयाने पोस्टमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या दृष्टिकोनानुसार, ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (SIMI) ला पुढील पाच वर्षांसाठी UAPA अंतर्गत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आले आहे.
भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडता धोक्यात आणणे, दहशतवादाला प्रोत्साहन देणे, शांतता आणि जातीय सलोखा बिघडवणे यात सिमीचा हात असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Web Title: Ban on simi extended by five years orders issued by ministry of home affairs nrab