Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेश हिंसाचार वाढवणार भारताची डोकेदुखी?; केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर

बांगलादेशातील बंडखोरी ही भारतासाठी चांगली बातमी नाही. यामागे दोन कारणे आहेत.  यातील पहिले कारण म्हणजे, याचा भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंधांवर काही प्रमाणात परिणाम होईल. दुसरे म्हणजे तेथे स्थापन झालेले नवीन सरकार चीन समर्थक असल्याने भारतासाठी ही धोक्याची घंटा असेल

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 06, 2024 | 12:09 PM
बांगलादेश हिंसाचार वाढवणार भारताची डोकेदुखी?; केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: बांगलादेशात सुरू असलेल्या ताज्या संघर्षावर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. केंद्र सरकारने बांगलादेशातील संघर्षावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षील बैठक बोलवली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव या बैठकीला उपस्थित आहेत.

भारतविरोधी शक्ती वाढण्याची भीती

हिंसाचारानंतर बांगलादेशात लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. तेथील लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगचा समावेश होणार नसल्याचे वृत्त आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामी हे दोन पक्ष सरकारमध्ये सामील होणार आहेत.  हे दोन्हीही पक्ष भारताविरुद्ध विष कालवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

जमात-ए-इस्लामीचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर बांगलादेश नॅशनल पार्टीने  संधी मिळेल तेव्हा भारतविरोधी कारवाया करण्याची संधी सोडलेली नाही. शेख हसीना यांनी पंतप्रधान असताना भारतविरोधी शक्तींना रोखून धरले होते. पण आता परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही. भारतविरोधी शक्ती बांगलादेशचा वापर दहशतवादी कारवायांसाठी तर करत नाहीत ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

सीमेवर परिस्थिती कशी असेल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा सुमारे 4000 किमी लांब आहे. जोपर्यंत शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, तोपर्यंत भारत सीमेच्या सुरक्षेबाबत निश्चिंत होता. यावेळी त्यांनी देशातील विकास आणि आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर आता सीमेबाबत खबरदारी वाढवावी लागणार आहे. विशेषत: ड्रग्ज, मानवी तस्करी आणि बनावट चलनाचा धोका येथे सतत दिसून येतो. बांगलादेशचे नवे सरकार या गोष्टी कशा हाताळते याची भारताला चिंता असेल.

दरम्यान, बांगलादेशातील सत्तापालटानंतर बांगलादेशचे अध्यक्ष शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. अनेक खटल्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर खालिदा नजरकैदेत आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनीही अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आणि शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे.

बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. शेरपूर कारागृहावर हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर शेरपूर कारागृहातून 518 कैदी फरार झाले आहेत. प्रतिबंधित जमात-उल-मुजाहिद्दीनचे अनेक दहशतवादीही पळून गेले आहेत. बांगलादेशमध्ये आज कर्फ्यू संपला आहे. आजपासून सर्व शाळा आणि बाजारपेठा सुरू होणार आहेत. बांगलादेशात सकाळी ६ वाजता कर्फ्यू हटवण्यात आला आहे.

Web Title: Bangladesh news india government me is in action mode over bangladesh issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 11:22 AM

Topics:  

  • Bangladesh Voilence
  • PM Narendra Modi
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
1

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल
2

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

PM Modi CCS meeting: PM मोदींची दिल्लीमध्ये हाय लेव्हल बैठक! पाकिस्तानची वाढली धास्ती; पुन्हा ऑपरेशन सिंदूर होणार?
4

PM Modi CCS meeting: PM मोदींची दिल्लीमध्ये हाय लेव्हल बैठक! पाकिस्तानची वाढली धास्ती; पुन्हा ऑपरेशन सिंदूर होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.