Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Who is Tarik Rahman: कुटंबाचे राजकारण संपवले, वयाच्या चौथ्या वर्षी तुरुंगवासची शिक्षा…: कोण आहेत तारिक रहमान?

२००७ मध्ये, तारिक रहमान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 13, 2026 | 12:28 PM
Who is Tarik Rahman:

Who is Tarik Rahman:

Follow Us
Follow Us:
  • तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार
  • बांगलादेश मुक्तीदरम्यान वयाच्या चौथ्या वर्षी काही काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा
  • तारिक रहमान यांच्या आई खालिदा झिया  बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान
BNP Wins Bangladesh Election 2026: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने १३ व्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार आहेत. निकालांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ला पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यानुसार, आता तारिक रहमान हे बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर विराजमान होतील, हे स्पष्ट झाले आहे. तारिक हे केवळ झियाउर रहमान आणि खालिदा झिया यांचे उत्तराधिकारी नाहीत तर सध्याच्या बांगलादेशातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. ते आता त्या देशाचे नेतृत्व करतील जिथे ते १७ वर्षे निर्वासित राहिले. पण त्याचवेळी तारिक रहमान नक्की कोण आहेत. असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

उत्तर कोरियात किम जोंग यांच्यानंतरही हुकूमशाही सुरुच राहणार; मुलीकडे मिळणार विशेष जबाबदारी

सुरुवातीचे जीवन आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

तारिक रहमान यांना राजकारणात तारिक झिया या नावानेही ओळखले जाते. तारिक रहमान यांना कुटुंबातून राजकारणाचे धडे मिळाले आहेत. ते झियाउल रहमान आणि खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म १९६७ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजेच आता बांगलादेशमध्ये झाला.

  वयाच्या ४ व्या वर्षी तुरुंगवासाची शिक्षा

१९७१ च्या मुक्ती युद्धादरम्यान, जेव्हा बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तारिक फक्त चार वर्षांचे होते आणि त्यांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले होते. बीएनपी त्यांना “सर्वात तरुण युद्धकैद्यांपैकी एक” म्हणून सन्मानित करते.

काही वर्षांनी त्यांचे वडील झियाउर रहमान यांची हत्या करण्यात आली त्यावेळी तारिक फक्त १५ वर्षांचे होते. वडिलांच्या हत्येनंतर तारिक यांचे संगोपन त्यांच्या आई खालिदा झिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, ज्या नंतर बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

राजकारणात प्रवेश

तारिक यांनी वयाच्या २३ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पूर्वी ढाका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केला होता. लष्करी शासक हुसेन मुहम्मद इरशाद यांच्याविरुद्धच्या चळवळीदरम्यान त्यांनी राजकीय सक्रियतेला सुरुवात केली आणि ते बीएनपीमध्ये सामील झाले.

Bangladesh Election Results : बांगलादेशात बीएनपीला मोठं यश; तारिक रहमान होणार पंतप्रधान

अटक, निर्वासन आणि संघर्ष

२००७ मध्ये, तारिक रहमान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. काही काळ राजकारणापासून दूर राहणार असल्याच्या अटीवरून तारिक यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेनंतर, ते २००८ मध्ये उपचारांसाठी लंडनला गेले आणि बराच काळ बांगलादेशला परतले नाहीत.

या काळात, शेख हसीना पुन्हा सत्तेत आल्या आणि बीएनपीच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. २०१८ मध्ये, २००४ मध्ये हसीना यांच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तारिक रहमान यांना त्यांच्या अनुपस्थितीत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. झिया कुटुंबाला राजकारणातून कायमचे वगळण्याचा हा प्रयत्न होता. ब्रिटनमध्ये राहत असताना, तारिक रहमान त्यांच्या पत्नी, हृदयरोगतज्ज्ञ आणि मुलीसह राहत होते.

पुनरागमन आणि राजकीय यश

शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर आणि त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्यानंतर, तारिक यांनी बांगलादेशी राजकारणात पुन्हा सक्रिय भूमिका सुरू केली. खालिदा झिया यांच्या निधनानंतर, त्यांना बीएनपीचे प्रमुख बनवण्यात आले. त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी प्रचंड विजय मिळवला. हा विजय केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नाही तर त्यांच्या खांद्यावर पुढे नेणाऱ्या कुटुंबाच्या वारशाचा सन्मान आहे.

 

 

 

 

Web Title: Ended family politics sentenced to prison at the age of four who is tarik rahman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Bangladesh
  • international news
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?
1

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला
2

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral
3

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?
4

Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.