Bangladeshi infiltrator returns to India in 45 days in New Delhi
Bangladeshi infiltrator : नवी दिल्ली : भारतामध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. शेजारील देशातून पैसे कमावण्याच्या आणि पोट भरण्याच्या उद्देशाने अनेक बांगलादेशी आणि नेपाळी लोक घुसखोरी करत आहेत. तसेच हजारो पाकिस्तानी लोक देखील भारतामध्ये वास्तव्य करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि सरकारकडून घुसखोरी करुन अवैध पद्धतीने देशामध्ये राहत असलेल्या लोकांना त्यांच्या मायदेशी पुन्हा पाठवले जात आहे. मात्र केवळ 45 दिवसांमध्ये हे घुसखोर पुन्हा भारतामध्ये आले असल्याचे दिसून आले आहे.
बांगलादेशातील एक तृतीयपंथी भारतामध्ये घुसखोरी करुन अवैध पद्धतीने राहत होता. मागील अनेक वर्षापासून तो देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. भीक मागून तो त्याचा उदरनिर्वाह करत होता. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. दिल्ली पोलिसांनी त्याला बांगलादेशला परत पाठवले होते. मात्र अवघ्या दीड महिन्यामध्ये तो बांगलादेशी घुसखोर पुन्हा भारतामध्ये आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्ली पोलिसांनी त्या बांगलादेशी घुसखोराला त्याच्या मायदेशी परत पाठवले होते. अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या या तृतीयपंथी व्यक्तीचे नाव सुहान खान असे आहे. त्याचे वय वर्षे 30 असून तो दिल्लीमध्ये काम करत होता. दिल्लीमधील शालीमार बाग चौक परिसरामध्ये भीक मागत होता. 30 जून रोजी या भागामध्ये दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली होती. त्यावेळी सुहानला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला बांगलादेशला पाठवून देण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांनी मे महिन्यात दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये छापेमारी करून ३०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. पहलगाम हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये ही मोहिम राबवण्यात आली होती. यामध्ये अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या लोकांवर कारवाई करुन त्यांना देशाबाहेर पाठवण्यात आले होते. यापैकी काहींना मे महिन्याच्या अखेरीस, तर काहींना जूनच्या पहिल्या आठवड्यात हिंडन एअरबेसवरून एका विमानाद्वारे त्रिपुरामधील अगरतळा येथे नेण्यात आलं. तिदिल्ली पोलिसांनी सुहान खानला १५ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे (FRRO) सोपवण्यात आलं होतं. तेथून त्यांना बांगलादेशी सीमेपलीकडे सोडण्यात आलं. मात्र, त्यांच्यापैकी सुहानने परत दिल्ली गाठली आहे. त्यामुळे भारताची सीमा पार करणे हे घुसखोऱ्यांसाठी किती सहज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. यामुळे सीमा भागातील सुरक्षा पुन्हा एकदा मुद्दा समोर आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की बांगलादेशला डिपोर्ट केल्यानंतर सुहानने मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचं नाटक सुरू केलं. त्यानंतर काही दिवस तो त्रिपुराच्या सीमेजवळ हिंडत राहिला. याचदरम्यान एके दिवशी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्याने पुन्हा एकदा सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. त्याने अगरतळा ते दिल्ली असा प्रवास केला. दिल्लीत आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर तो पुन्हा एकदा शालीमार बाग येथे गेला. जिथे तो पूर्वी राहत होता तिथेच राहू लागला. याच परिसरात भीक मागू लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.