• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mahavikas Aghadi Will Split Congress Is Preparing To Take A Big Decision

Cogress Politics: महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

काँग्रेसने महाविकास आघाडीने (MVA)एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवल्या तर मुंबईत पक्षाची ताकद आणखी कमी होईल. २००७ च्या बीएमसी निवडणुकीत पक्षाने ७५ जागा जिंकल्या होत्या

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 02, 2025 | 10:44 AM
Cogress Politics: महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीत फूट पडणार; काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Congress on BMC Elections:   गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या. कोणत्या क्षणी काहीही होऊ शकते, अशी शक्यता आजही वर्तवली जात असते. गेल्या वर्षी झालेली लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीतही सतत नवीन बदल दिसून येत आहेत. कोणता पक्ष कोणासोबत आणि कधी जाऊ शकतो हे सांगणे खूप कठीण आहे. अशातच आता मुंबईत महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, अशी मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आगामी मुंबई महापालिकेसह, राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहे. काँग्रेस हे पाऊल उचलणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

काँग्रेसने असा निर्णय घेण्याचे कारण काय?

खरंतर, शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीचे संकेत सतत देत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकतेनंतर काँग्रेस आता सतर्क झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आगामी बीएमसी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत महाविकास आघाडी तुटू शकते असे मानले जात आहे.

पाकिस्तानचा पर्दाफाश! पहलगाम हल्ल्यावर QUAD चा ठाम संदेश; असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांना मोठा धक्का

निर्णय कधी घेता येईल?

या संदर्भात, मुंबई महानगरपालिका निवडणूक एकट्याने लढवण्याबाबत मुंबई काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडून अभिप्राय घेण्यात आला आहे. ठाकरेंसोबत युती करून निवडणूक लढवल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईल, असे बहुतेक नेत्यांचे मत आहे. मुंबईत पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी, त्यांनी जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. मुंबई काँग्रेस कदाचित ७ जुलैपर्यंत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकते.

कधी आहे बीएमसी निवडणूक ?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २९ महानगरपालिका, २४८ नगरपरिषदा, ४२ नगर पंचायती, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या यांचा समावेश आहे. यापैकी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीच्या २२७ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्यापक असल्याने त्यांना महाराष्ट्राच्या ‘मिनी विधानसभा’ निवडणुका देखील म्हटले जाते.

बुलढाण्यात शिक्षकाने रागावण्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल;

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडून स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस वरिष्ठ नेतृत्त्वासोबत चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष लवकरच यावर निर्णय घेणार असल्याचे दिसून येत आहे. जानेवारीमध्ये, शिवसेनेने (यूबीटी) नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला होतील.

काँग्रेस पक्षनेतृत्त्वाशी राज्यातील नेत्यांची बैठक

सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, राज्यसभा सदस्य आणि सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी राज्य युनिट प्रमुख नाना पटोले आणि राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. बैठकीत उपस्थित असलेल्या सुत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला यांदर्भात माहिती दिली. काँग्रेसने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी. तरीही “आम्ही एकटे निवडणूक लढवणे पक्षासाठी चांगले राहील, असा आम्ही निर्णय घेतला आहे. पण युतीबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेईल.यासंदर्भात येत्या ७ जुलै रोजी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

जर काँग्रेसने महाविकास आघाडीने (MVA)एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवल्या तर मुंबईत पक्षाची ताकद आणखी कमी होईल. २००७ च्या बीएमसी निवडणुकीत पक्षाने ७५ जागा जिंकल्या होत्या, २०१२ मध्ये ५६ आणि २०१७ मध्ये गेल्या निवडणुकीत ३१ जागा जिंकल्या होत्या. पण बीएमसी निवडणूक स्वबळावर लढवल्यासपक्षाला संघटना आणि नेतृत्व तयार करण्यास मदत होते. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि मुंबईत आपली जमीन गमावणे परवडणारे नाही,” असेही सांगण्यात आले आहे

Web Title: Mahavikas aghadi will split congress is preparing to take a big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 10:44 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM
Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Nov 18, 2025 | 09:51 PM
Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Nov 18, 2025 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.