Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संशयावरून बँक खाते आता होणार नाही फ्रीज; RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा

नवीन फ्रेमवर्कनुसार बँकांना 'एआय' आधारित व्यवहार देखरेख प्रणालीचा वापर करावा लागेल. या प्रणालीद्वारे अशा व्यवहारांची ओळख पटवली जाईल, जे ग्राहकाच्या सामान्य प्रोफाइलच्या तुलनेत अचानक किंवा असामान्य आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 15, 2026 | 12:27 PM
संशयावरून बँक खाते आता होणार नाही फ्रीज; RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा

संशयावरून बँक खाते आता होणार नाही फ्रीज; RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सायबर फसवणूक आणि संशयास्पद व्यवहारांशी जोडलेल्या प्रकरणांमध्ये बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एका नवीन आराखड्‌याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्याअंतर्गत बँकेत संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँक संपूर्ण बँक खाते फ्रीज करू शकणार नाही. बँकेला केवळ ज्या व्यवहारावर वाद किंवा सायबर फसवणुकीचा संशय आहे, तितक्याच रकमेवर तात्पुरती बंदी घालावी लागेल.

प्रस्तावित नियमांनुसार, जर १,००० रुपये किंवा त्याहून अधिकचा असामान्य व्यवहार एखाद्या खात्याला ‘म्युल अकाउंट’ किंवा सायबर फसवणुकीशी जोडलेला दाखवत असेल, तर बँका फक्त संबंधित रक्कमेवरच तात्पुरती रोक लगावू शकतील. उर्वरित खात्याचे व्यवहार पूर्ववत सुरू राहतील. रिझर्व्ह बँकेने हे प्रस्तावित नियम सार्वजनिक अभिप्रायासाठी जारी केले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे १ एप्रिल २०२७ पासून लागू करण्याचे प्रस्तावित आहे.

दरम्यान, नवीन प्रणालीत बँक ग्राहकाला संशयास्पद व्यवहाराची कायदेशीर वैधता सिद्ध करण्यासाठी २० कॅलेंडर दिवसांचा वेळ देईल. ग्राहक आपली ओळख, व्यवहाराचा उद्देश आणि पैशांच्या स्रोताशी संबंधित कागदपत्रे सादर करून रक्कमेची वैधता स्पष्ट करू शकेल. यानंतर बँकेला ग्राहकाचे स्पष्टीकरण आणि दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी १० कॅलेंडर दिवसांचा कालावधी मिळेल.

AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर

…अन्यथा पोलिस ठाण्यात जाणार प्रकरण

ग्राहकाने 20 दिवसांच्या आत उत्तर दिले नाही किंवा त्याच्या स्पष्टीकरणाने सायबर फसवणुकीचा संशय दूर झाला नाही, तर बँक हे प्रकरण संबंधित पोलिसांकडे वर्ग करेल. अशा स्थितीत बँक ती रक्कम स्वतःच्या स्तरावर अनिश्चित काळासाठी फ्रीज करून ठेवू शकणार नाही. प्रकरण पोलिसांकडे पाठवल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी कायदा अंमलबजावणी यंत्रणेची असेल.

संपूर्ण खाते फ्रीज करण्याऐवजी…

पोलिसांना हे प्रकरण प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत अधिकृत वैधानिक बंदीचे आदेश जारी करावे लागतील. आरबीआयचा प्रस्तावित आराखडा संशयास्पद म्यूल अकाउंटच्या प्रकरणांमध्ये संपूर्ण खाते फ्रीज करण्याऐवजी केवळ संशयास्पद किंवा वादग्रस्त रक्कमेवरच लक्ष्यित कारवाईचा मार्ग अवलंबणार आहे.

AI च्या साह्याने पकडले जाणार संशयास्पद व्यवहार

नवीन फ्रेमवर्कनुसार बँकांना ‘एआय’ आधारित व्यवहार देखरेख प्रणालीचा वापर करावा लागेल. या प्रणालीद्वारे अशा व्यवहारांची ओळख पटवली जाईल, जे ग्राहकाच्या सामान्य प्रोफाइलच्या तुलनेत अचानक किंवा असामान्य आहेत. याशिवाय, ग्राहकाच्या घोषित उत्पन्नाच्या किंवा प्रोफाइलच्या तुलनेत खूप मोठे असलेले किंवा आधीपासून ओळखल्या गेलेल्या सायबर फ्रॉड नेटवर्कशी जोडलेले व्यवहार यांवरही बारीक लक्ष ठेवले जाईल.

Web Title: Bank accounts will no longer be frozen based on suspicion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • bank accounts
  • RBI news

संबंधित बातम्या

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?
1

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?

QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? थांबा! एका चुकीने बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं
2

QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? थांबा! एका चुकीने बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.