काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भाजपवर बऱ्याच काळापासून मत चोरीचे आरोप करत आहेत. गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत जाणूनबुजून हेराफेरी करण्यात आली. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून विशेष सघन पुर्नपडताळणी म्हणजे एसआयआरची घोषणा कऱण्यात आली. पण या एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीत पुन्हा फेरफार होत असल्याचा आरोप करत राहुल गांधींनी आयोगावर जोरदार टीका केली. या सगळ्या आरोप प्रत्यारोपात काँग्रेसने पुन्हा एकदा ट्विटर एक्स वर एक व्हिडिओ शेअर करून मत चोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि निवडणूक आयोगाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसने जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये, काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगावर निवडणुकीत हेराफेरी आणि मत चोरीचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ बिहारी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. गाण्यात असे म्हटले आहे की, बीजेपी और चुनाव आयोग वोटवा चोर लागेला, वोटिंग में भईल घोटाला, राहुल भईया का खुलासा. एनडीए चोर लागेला, बीजेपी चोर लागेला. रोजगार पे डाला ताला, वोट पे डाका डाला. फर्जी वोट डलाए, संविधान को बेच डाला. दलित, युवा या पिछड़ा, अब बोल रही सारी जनता एनडीए चोर लागेला, वोटवा चोर लागेला. बीजेपी और चुनाव आयोग वोटवा चोर लागेला. कर्नाटक, हरियाणा और महाराष्ट्र के चोरी कराई, चोरों की टोली में चलकर इस बार बिहार को आई-आई और यहां न चोरी चली. यहां हक की बात चली.” असे या गाण्याचे बोल आहेत.
BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा
या व्हिडिओमध्ये, पुढे, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी दाखवले आहे आणि काँग्रेसने विजय सिन्हा हे बनावट मतदार असल्याचा उल्लेखही केला आहे. तसेच, बिहारच्या मतदार यादीतून एका निवृत्त आयएएस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचेही नाव गायब झाल्याचाही उल्लेख यात करण्यात आला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगावर पाच प्रकारे मतदान चोरीचा आरोप केला आहे. यात मतदार यादीत २२ मृतांची नावे आणि त्यांचे नातेवाईक फॉर्म भरत नसल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तर जुमईमध्ये एकाच पत्त्यावर २३० लोकांचा उल्लेख आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीतील हा मतचोरीचा घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यासाठी १७ ऑगस्टपासून राहूल गांधी ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू केली आहे. पण त्याच दिवशी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे हे आरोप फेटाळून लावले. तसेच राहुल गांधींना शपथपत्र दाखल करण्यास किंवा माफी मागण्याचा इशारा दिला आहे. . राहुल गांधी यांनी रविवारी सासाराम येथून मतदार हक्क यात्रा सुरू केली. राहुल गांधींची ही यात्रा १६ दिवस चालणार असून २० जिल्ह्यामधून १३०० किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. सुरुवातीला आरजेडी नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव या यात्रेत सामील झाले, तर येत्या काळात डाव्या पक्षांचे नेते आणि इंडिया अलायन्सच्या इतर घटक पक्षांचे नेते देखील यात सहभागी होणार आहेत.
Full Song : वोटवा चोर लगेगा…
.
.
.
.
.
.
.
.
.#VoterAdhikarYatra #VoteChori #VoteChor #trendingnow #trendingsong #Bihar pic.twitter.com/AvLp3hBWaX— Bihar Congress (@INCBihar) August 16, 2025