Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Politics: कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप; मुख्यमंत्री सिद्धारामय्या राजीनामा देणार?

कर्नाटक काँग्रेसजच्या वर्तुळात सिद्धरामय्या यांना पद सोडण्यास सांगितले जाऊ शकते आणि त्यांना केंद्रीय संघटनेत काही जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 09, 2025 | 04:26 PM
Karnatak Politics: कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप; मुख्यमंत्री सिद्धारामय्या राजीनामा देणार?
Follow Us
Close
Follow Us:

Karnatak Politics: कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या काही काळापासून कर्नाटकमध्ये नेतृत्त बदलाची मागणी होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू  लागली आहे. हा वाद शांत करण्यासाठी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी तातडीने कर्नाटक गाठले आणि डी.के शिवकुमार यांच्या शेजारी बसून माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला.   पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून डी.के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात होती. पण सिद्धारामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षांनंतर डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या सगळ्यात अडीच वर्षांनंतर पुन्हा  शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा जोर धरू लगल्या

हा वाद थांबला असे मानले जात असतानच आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या. या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी  दिल्लीत एक बैठक बोलवली असून या  बैठकीला सिद्धरामय्या यांच्यासह डीके शिवकुमार देखील उपस्थित राहतील.

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; अल्पसंख्यांक समितीची कारवाईची मागणी

कर्नाटक काँग्रेसजच्या वर्तुळात सिद्धरामय्या यांना पद सोडण्यास सांगितले जाऊ शकते आणि त्यांना केंद्रीय संघटनेत काही जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे. त्यांना काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. मात्र, यावर कोणीही उघडपणे  प्रतिक्रीया दिलेली नाही. २०२३ मध्ये निवडणूक निकाल आल्यापासून डीके शिवकुमार यांचा दावा होता, परंतु काही प्रकरणांमुळे त्यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून त्यांचे समर्थकांकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा करार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण  सिद्धरामय्या यांच्या गटाकडून हा दावा कायम फेटाळण्यात आला.

कर्नाटकातील सत्तासमीकरणावर राजकीय चर्चांना उधाण आले असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या संभाव्य ‘बाहेर पडण्याच्या’ रणनीतीबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यासंदर्भात दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.

“मुख्यमंत्री, सरचिटणीस आणि मी दिल्लीतच राहणार आहोत. पक्षीय घडामोडींवर चर्चा होईल,” असे शिवकुमार यांनी सांगितले. त्यांना विचारण्यात आले की, “सिद्धरामय्यांचा राजीनामा देण्याचा विचार ठरलेला आहे का? आणि त्यांना काँग्रेसच्या ओबीसी समितीचे अध्यक्ष करण्यात येणार आहे का?”यावर उत्तर देताना डी. के. शिवकुमार म्हणाले, “सिद्धरामय्या हे ओबीसी वर्गाचे प्रभावशाली नेते आहेत. १५ जुलैपासून बेंगळुरूमध्ये ओबीसी समितीची बैठक होणार असून ती त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे, जरी ते या समितीचे औपचारिक अध्यक्ष नसले तरीही.”

स्मार्टवर्क्सचा IPO उद्या होणार सुरू, ५८३ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य

दरम्यान, राहुल गांधी यांची भेट घेण्याआधीच डी. के. शिवकुमार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींमध्ये आणखी रंगत आली आहे.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगत असतानाच, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. जेव्हा त्यांना पक्षात वाढत असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले, “सध्या मुख्यमंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे या विषयावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही.”

मुख्यमंत्री बदलाची मागणी अशा वेळी समोर येत आहे, जेव्हा पक्षाचे हायकमांड आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या या मागण्यांना सातत्याने नाकारत आहेत. सिद्धरामय्या यांनीही यापूर्वी स्पष्टपणे सांगितले आहे की, ते आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. शिवकुमार यांनी देखील पूर्वी वक्तव्य केले होते की, “मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.” त्यामुळे आताच्या घडामोडींमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता धूसर होत आहे.

 

Web Title: Big earthquake in karnataka politics will chief minister siddaramaiah resign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 04:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.