तेजप्रताप यादव दुसऱ्या पक्षाची धोषणा करण्याची शक्यता
Bihar Politics: महाराष्ट्राच्या दोन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या फूटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथीही घडल्या. यानंतर देशाच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव आज (१८ जुलै) त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करू शकतात. ते संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतील. नवीन पक्ष/संघटनेची माहिती यामध्ये दिली जाऊ शकते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांना सहा वर्षांसाठी राजदमधून काढून टाकले होते. एवढेच नाही तर त्यांना कुटुंबातूनही काढून टाकण्यात आले होते. एकीकडे या वर्षी म्हणजेच २०२५ बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेज प्रताप यादव सध्या हसनपूरचे आमदार आहेत. ते २०१५ ते २०२० पर्यंत महुआचे आमदार होते. राज्यात ऐन निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच काही दिवसांपूर्वी तेज प्रताप यादव यांची सहा वर्षांपासून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर ते आता स्वत:चा वेगळा मार्ग चाचपडताना दिसत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत ते आपली ताकद दाखवू शकतात असे मानले जाते.
संपूर्ण प्रकरण अनुष्का यादवशी संबंधित आहे. एकीकडे, तेज प्रताप यादव यांचा ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटाचा खटला सुरू आहे. घटस्फोटाचे प्रकरण सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी त्यांनी अनुष्का यादव या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे एक्स ट्विटर पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले. त्यांच्या पोस्टनंतर वडील लालू प्रसाद यादव यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून तेजप्रताप यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांना कुटुंबातूनही काढून टाकण्यात आले होते.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेत तेज प्रताप यादव यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर केले आहे. स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली.
ब्रोकरेज फर्म जेफरीजने दिला ‘हे’ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला, २७ टक्क्यांपर्यंत होऊ शकते वाढ
या पोस्टमध्ये लालूंनी स्पष्ट शब्दांत लिहिले की, “वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे उपक्रम, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वागणूक ही आमच्या कौटुंबिक मूल्यांना अनुरूप नाही. त्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. लालू प्रसाद यादव यांनी लिहिले आहे की, “त्या व्यक्तीला (तेज प्रतापला) ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. ती व्यक्ती आता पक्षात आणि कुटुंबात कोणतीही भूमिका बजावणार नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णय तिने स्वतः घ्यावेत, आणि इतरांनीही विवेकबुद्धीनेच संबंध ठेवावेत.”
या पार्श्वभूमीवर अनुष्का यादव तेज प्रतापसोबत नव्या पक्षात सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेज प्रताप यादव यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त समोर आले असून, त्यात अनुष्का यादवही सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र बिहारच्या राजकारणात नेहमीच नाट्यमय घडामोडी घडत असतात, त्यामुळे काहीही शक्य आहे.