Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Golden Temple Firing: मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्णमंदिराबाहेर गोळीबार

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदीराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. सुखबीरसिंह बादल यांच्यावर हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 04, 2024 | 10:24 AM
Golden Temple Firing: मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्णमंदिराबाहेर गोळीबार
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब: पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदीराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.  पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झाला. पण सुदैवाने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.  सुखबीरसिंग बादल सुवर्ण मंदिराच्या बाहेर  रक्षक म्हणून काम करत होते. त्याचवेळी तिथे एका व्यक्तीने बादल यांच्यावर अचानक गोळीबार केला.  मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले.

बातमी अपडेट होत आहे…..

VIDEO | Punjab: A man opened fire at Shiromani Akali Dal leader Sukhbir Singh Badal at the entrance of Golden Temple, Amritsar. The person was overpowered by people present on the spot. More details are awaited.#PunjabNews #SukhbirSinghBadal

(Full video available on PTI… pic.twitter.com/LC55kCV864

— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2024

 

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर एका व्यक्तीने अचानक गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. ही घटना घडली तेव्हा तेथे अनेक लोक उपस्थित होते. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. नारायण सिंह चौडा असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. तो दल खालसाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सुखबीरवर हल्ला करण्यासाठी त्याने पॅन्टमधून पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला पकडले आणि गोळी अकाली दलाच्या नेत्याला लागली.

International Bank Day : आंतरराष्ट्रीय बँक दिनानिमित्त बँकांचे मुख्य काम काय आहे ते जाणू

शीख धर्मगुरूंनी ‘धार्मिक शिक्षा दिल्यानंतर अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी काल सुवर्ण मंदिराबाहेर ‘सेवादार’ म्हणून काम केले. आज त्यांच्या शिक्षेचा दुसरा दिवस होता, आजही ते मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपाल म्हणून एका हातात भाला धरून, निळा ‘सेवादार’ गणवेश परिधान करून सेवा देत होते. त्यांच्या त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले ते व्हिलचेअरवर बसूनच आपली सेवा देत होते.  त्याचवेळी त्यांच्यासोबत अकाली दलाचे दुसरे एक नेते सुखदेव सिंग धिंडसा यांनीही व्हीलचेअरवर बसून ‘सेवादार’ची भूमिका बजावली. धिंडसा हे वृद्ध असल्याने तेदेखील व्हीलचेअरवर होते. याशिवाय पंजाबचे माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया आणि दलजित सिंग चीमा यांनी शिक्षेचा भाग म्हणून भांडी धुतली. तसेच, सुखबीर बादल आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या गळ्यात छोटे फलक लटकवलेले होते ज्यात त्यांच्या “चुकीची” कबुली देण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर ‘सेवादार’ म्हणून काम केले.

मोड आलेले हरभरे खाल्याने पत्नीला राग अनावर; करंगळीचा चावा घेतला अन् मिक्सरच्या भांड्याने

Web Title: Big news firing outside the golden temple in amritsar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 09:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.