पत्नीची पतीला लाटण्याने मारहाण (फोटो- istockphoto)
Pune Crime News: घरात भिजवलेले (मोड आलेले) हरभरे खाल्याने पत्नीने पतीला लाटण्याने व मिक्सरच्या भांड्याने मारहाण करत त्याच्या करंगळीचा चावा घेऊन नख तोडल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार पेठेत घडला. या प्रकरणी सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या ४० वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे ठेवले होते. पतीने ते खाल्ले. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले. वादानंतर पत्नीने पतीला शिवीगाळ केली. त्याला लाटण्याने मारहाण केली. पत्नीने लाटण्याने तळ हातावर, डोक्यात, पाठीवर मारले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे पोटाला ओरखडले. त्यावेळी तक्रारदाराने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले. नंतर पत्नीने तक्रारदाराची पँन्ट खाली ओढली. यामुळे तक्रारदार खाली बसले. पत्नी मारहाण करीत असताना स्व रक्षणासाठी तक्रारदाराने दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रारदाराच्या पत्नीने हाताच्या करंगळीला चावून नख तोडले. घटनेनंतर घाबरलेल्या पतीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात भररस्त्यात हत्येचा थरार!
शाळकरी मुलांमध्ये वादावादी होऊन एकमेकांच्या हत्येचा प्रयत्न होत असतानाच पुर्ववैमन्यासातून १७ वर्षीय एका मुलाचा दोघांनी भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कॉलेजला जात असताना त्याला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगण्यात आले आहे. भल्या सकाळी वानवडीतील रामटेकडी येथे मंगळवारी ही घटना घडली आहे. याघटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.यश सुनील घाटे (वय १७, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल लतीफ शेख (वय १८) व ताहीर खलील पठाण (वय १८, रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक केली आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात यशचा भाऊ प्रज्वल सुनील घाटे (वय २०) याने तक्रार दिली आहे.
हेही वाचा: Crime News: पुण्यात भररस्त्यात हत्येचा थरार! मुलावर कोयत्याने सपासप वार, कारण वाचाल तर…
पोलिसांच्या माहितीनुसार, यश घाटे हा हडपसर परिसरातील एका खासगी महाविद्यालयात शिकत होता. तर, आरोपी त्याच्याच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात यापुर्वी वाद झाले होते. एकमेकांकडे पाहण्यावरून हे वाद झालेले होते. त्यावेळी यश याचा भाऊ प्रज्वल याने तो वाद मिटवला देखील होता.या दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण तसेच श्रेयश शिंदे असे जामा मस्जिदसमोरून रामटेकडी येथून कॉलेजला जात होते. त्यावेळी साहिल शेख व ताहीर पठाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून यशला अडवले.