Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar election 2025: भाजपने डाव टाकला; निवडणुकीच्या तोंडावर लालू आणि तेजस्वींना घेरण्याची तयारी

दिल्ली न्यायालयांमध्ये ही सुनावणी अशा वेळी होत आहे जेव्हा २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव दोघेही सध्या महाआघाडीसाठी जागा वाटपाच्या व्यवस्थेत व्यस्त आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 13, 2025 | 10:52 AM
Bihar election 2025:

Bihar election 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादवांना घेरण्याची तयारी
  • त्या दोन घोटाळ्यांप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी
  • आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित प्रकरणे

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीच्या विविध न्यायालयांमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अनेक खटल्यांची सुनावणी आज (१३ ऑक्टोबर) होणार आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये त्यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे, तर काही प्रकरणांमध्ये त्यांच्या गैरहजेरीतही सुनावणी होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे देखील काही प्रकरणांमध्ये आरोपी आहेत. त्यामुळे आजचा दिवस दोन्ही पिता-पुत्रांसाठी राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. प्रथम, सकाळी १० वाजता, दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात आयआरसीटीसी घोटाळ्याशी संबंधित सुनावणी होणार आहे. लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि या प्रकरणातील इतर आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल.

112 crore Scam: फलटणच्या यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत ११२ कोटींचा घोटाळा; ५० जणांवर गुन्हा दाखल

रेल्वेमंत्री असताना नोकरीसाठी जमीन आरोप

आयआरसीटीसी घोटाळा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाचा आहे. त्यांच्यावर दोन रेल्वे हॉटेल्ससाठी निविदा देण्यात अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अनेक कंपन्यांना फायदा झाला. या प्रकरणात सीबीआयने लालू कुटुंब आणि संबंधित कंपन्यांवर भ्रष्टाचार आणि कट रचल्याचा आरोप लावला आहे. आजच्या सुनावणीत, आरोपींची हजेरी आणि पुढील कार्यवाही न्यायालय निश्चित करेल.

लँड फॉर जॉब्स प्रकरणाची आज सुनावणी

लालू कुटुंबाशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा खटला म्हणजे लँड फॉर जॉब्स घोटाळा. या प्रकरणाची सुनावणीही आज न्यायालात होणार आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाचा हा खटला आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वेच्या नोकऱ्या देण्याच्या बदल्यात लोकांकडून जमीनी विकत घेतल्याचा आरोप आहे. आजच्या सुनावणीत या प्रकरणात आरोप निश्चित केले जातील. पण या सुनावण्यांसाठी लालू किंवा तेजस्वी यांची वैयक्तिक उपस्थिती आवश्यक नाही. कोणत्या कलमांखाली आरोप निश्चित केले जातील आणि पुढील खटल्याची प्रक्रिया न्यायालय ठरवेल.

AFG vs PAK : भारताप्रमाणे अफगाणिस्तान देखील पाकिस्तानला भाव नाही देणार? ACB ने घेतला मोठी निर्णय

राऊस अव्हेन्यू कोर्टात खटला क्रमांक ३ आणि ४

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात आज सुनावणीसाठी हे दोन्ही खटले अनुक्रमे क्रमांक ३ आणि ४ वर सूचीबद्ध आहेत. म्हणजेच, दोन्ही प्रकरणांमधील सुनावणी दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सीबीआय आणि ईडी दोघेही या प्रकरणांमध्ये कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी आरोपपत्रे आणि पुरावेही सादर केले आहेत. आजच्या सुनावणीमुळे या प्रकरणांचा भविष्यातील मार्ग निश्चित होऊ शकतो.

प्रकरण महत्त्वाच्या टप्प्यात

राऊस अव्हेन्यू न्यायालयातील विशेष अंमलबजावणी संचालनालय (ED) न्यायालयात आणखी एक प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध झाले आहे. या प्रकरणात उद्योगपती अमित कात्याल यांचा समावेश असून, त्यांचा संबंध लालू प्रसाद यादव यांच्या कथित आर्थिक घोटाळ्यांशी जोडला जातो. या सुनावणीसाठी लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्याची गरज नसली, तरी हा खटला त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासाचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणातील ईडीचा अहवाल ‘लँड फॉर जॉब्स’ आणि ‘आयआरसीटीसी’ घोटाळ्यांवरही परिणाम करू शकतो.

बिहार निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना राजदला घेरण्याची तयारी

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असतानाच दिल्ली न्यायालयांमध्ये ही सुनावणी  होत आहे.  लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव दोघेही सध्या महाआघाडीसाठी जागा वाटपाच्या व्यवस्थेत व्यस्त आहेत. काँग्रेस, जेडीयू आणि राजद यांच्यात जागा वाटपावर अंतिम चर्चा सुरू आहे आणि त्याच दिवशी त्यांच्या न्यायालयात हजेरीने राजकीय गोंधळ आणखी वाढवला आहे. भाजपने महाआघाडीविरुद्ध भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्याची ही संधी साधली आहे. असे मानले जाते की लालू आणि तेजस्वी यांच्या न्यायालयात हजेरीमुळे निवडणुकीच्या वातावरणात सार्वजनिक निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

 

Web Title: Bihar election 2025 bjp makes a move preparing to surround lalu and tejashwi on the eve of the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • Lalu Prasad yadav

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: राजकीय मोठी बातमी; NDA चे जागावाटप निश्चित, कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?
1

Bihar Election 2025: राजकीय मोठी बातमी; NDA चे जागावाटप निश्चित, कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?

Bihar Election 2025: जागावाटपात भाजपची कोंडी कायम; JDU ची १०३ उमेदवारांची यादी अंतिम, ‘या’ महत्त्वाच्या जागांवर मोठा ‘गेम’?
2

Bihar Election 2025: जागावाटपात भाजपची कोंडी कायम; JDU ची १०३ उमेदवारांची यादी अंतिम, ‘या’ महत्त्वाच्या जागांवर मोठा ‘गेम’?

Bihar Election 2025: ‘राहुल गांधींचे जे हाल झाले तेच…’; प्रशांत किशोर थेट तेजस्वी यादवांना आव्हान देणार?
3

Bihar Election 2025: ‘राहुल गांधींचे जे हाल झाले तेच…’; प्रशांत किशोर थेट तेजस्वी यादवांना आव्हान देणार?

Bihar Election 2025: बिहारमध्ये ओवैसोची मोठी खेळी! १०० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी; तेजस्वी-राहुलचा ‘खेळ’ बिघडवणार?
4

Bihar Election 2025: बिहारमध्ये ओवैसोची मोठी खेळी! १०० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी; तेजस्वी-राहुलचा ‘खेळ’ बिघडवणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.