Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025:NDAचं जागावाटप निश्चित; कुणाला मिळाल्या किती जागा? महाआघाडीचं घोडं कुठे अडलं?

जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतर, धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, 'एनडीएच्या सर्व मित्रपक्षांनी जागावाटप प्रक्रिया सौहार्दपूर्णपणे पूर्ण केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 13, 2025 | 12:55 PM
Bihar Election 2025:

Bihar Election 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए’चं जागावाटप निश्चित
  • जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांना प्रत्येकी सहा-सहा जागा
  • चिराग पासवान २९ जागांसाठी सहमत

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए’चं जागावाटप निश्चित झाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री आणि बिहारचे भाजप प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी जागावाटपासंदर्भात घोषणा केली आहे. एनडीएच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, भाजप आणि जेडीयू दोन्ही प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी (आर) २९ जागांवर निवडणूक लढवेल. जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाला ०६ जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) लाही ०६ जागा देण्यात आल्या आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र कुशवाह यांना देण्यात आलेल्या सहा जागांमध्ये उजीयारपूर, मधुबनी, सासाराम, दिनारा, महुआ आणि बाजपट्टी यांचा समावेश आहे. पण यासंदर्भात आज (१३ ऑक्टोबर) अधिकृत घोषणा केली जाईल. जीतनराम मांझी यांना देण्यात आलेल्या सहा जागांमध्ये टेकरी, कुटुम्बा, अत्री, इमामगंज, सिकंदरा आणि बाराचट्टी या सहा विधानसभा जागांचा समावेश आहे. तर, चिराग पासवान यांना त्यांच्या पसंतीच्या तीन जागा मिळवण्यात यश आल्याचेही सांगितले जात आहे. या तीन जागा सर्वात जास्त स्पर्धात्मक होत्या. हिसुआ, गोविंदगंज आणि ब्रह्मपूर या सर्व जागा चिराग पासवान  यांना  मिळाल्या आहेत.

Thackeray Brothers alliance :ठाकरे बंधूंच्या युतीला कॉंग्रेसचं ग्रहण? राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय?

पीटीआयच्या वृत्तानुसार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू होताच, धर्मेंद्र प्रधान यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. यात केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी सहा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतर, धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘एनडीएच्या सर्व मित्रपक्षांनी जागावाटप प्रक्रिया सौहार्दपूर्णपणे पूर्ण केली आहे. सर्व एनडीए पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आह. बिहार दुसऱ्या एनडीए सरकारसाठी तयार आहे.

मांझींना सहा जागा मिळाल्या

१५ जागांची मागणी करणारे जीतन राम मांझी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या घोषणेपूर्वी, आपण शेवटच्या श्वासापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उभे राहणार.” असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, जागावाटपाच्या घोषणेनंतर मांझी यांनी भाजप नेतृत्वाचा निर्णय स्वीकारणार असल्याचेही त्यांनी असे सांगितले असले तरी, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कथित कमी लेखण्याबद्दल देखील व्यक्त केले, ज्याचा एनडीएवर परिणाम होऊ शकतो. मांझी यांना सहा जागा मिळाल्या.

चिराग पासवान २९ जागांसाठी सहमत

जागावाटपाची घोषणा काही दिवसांच्या तीव्र वाटाघाटीनंतर झाली. एनडीएचे सहयोगी चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांनी भाजपशी जोरदार वाटाघाटी केल्या, अनेकदा वादही झाला आणि ते वाद शांतही झाले. सुरुवातीला ४० जागांसाठी आग्रही असलेले चिराग पासवान यांना २९ जागांसाठी राजी करण्यात भाजपला यश आले. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या चिराग पासवान यांच्याकडे एकही आमदार नाही.

IIT JAM 2026: आयआयटी जॅम एक्झामसाठी नोंदणी तारीखमध्ये वाढ, आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

राजद आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू

दुसरीकडे बिहारमधील विरोधी इंडिया आघाडी पुढील काही दिवसांत जागावाटपाचा अंतिम निर्णय घेणार आहे. तर या आठवड्यात आपले उमेदवार जाहीर करू शकते, अशी अपेक्षा आहे. माहितीनुसार, राजद आणि काँग्रेसमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहेत. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव नवी दिल्लीत असल्याने सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसांत घेतला जाईल: जयराम

जागावाटपाच्या घोषणेसाठी झालेल्या विलंबाबद्दल, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, त्यांना “महाआघाडी” मध्ये काही नवीन मित्रपक्षांचा समावेश होणार आहे. त्यांनाही जागावाटपाच्या व्यवस्थेत समावून घ्यावे लागणार आहे. त्या सर्व जागांवर अंतिम निर्णय घेण्याची आणि पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांची घोषणा करण्याची आशा आहे. यावेळी काँग्रेस किती जागा लढवेल याबद्दल विचारले असता, जयराम रमेश म्हणाले, “अर्धशतक ते शतकाच्या दरम्यान.” खरं तर, गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या आणि १९ जागा जिंकल्या, तर राजदने १४४ जागा लढवल्या आणि ७५ जागा जिंकल्या.

गेल्या निवडणुकीची परिस्थिती

२०२० मध्ये, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने ११५ जागा लढवल्या, तर भाजपने ११० जागा लढवल्या. मांझी यांच्या एचएएमने ७ जागा लढवल्या आणि मुकेश साहनी यांच्या व्हीआयपींनी ११ जागा लढवल्या. त्यावेळी साहनी एनडीएचा भाग होते. तथापि, नितीश कुमार यांच्याशी मतभेद असल्याने चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या.

 

Web Title: Bihar election 2025 nda seat sharing confirmed who got how many seats where did the maha aghadis horse stop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • Bihar Election 2025

संबंधित बातम्या

Bihar election 2025: भाजपने डाव टाकला; निवडणुकीच्या तोंडावर लालू आणि तेजस्वींना घेरण्याची तयारी
1

Bihar election 2025: भाजपने डाव टाकला; निवडणुकीच्या तोंडावर लालू आणि तेजस्वींना घेरण्याची तयारी

Bihar Election 2025: राजकीय मोठी बातमी; NDA चे जागावाटप निश्चित, कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?
2

Bihar Election 2025: राजकीय मोठी बातमी; NDA चे जागावाटप निश्चित, कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?

Bihar Election 2025: जागावाटपात भाजपची कोंडी कायम; JDU ची १०३ उमेदवारांची यादी अंतिम, ‘या’ महत्त्वाच्या जागांवर मोठा ‘गेम’?
3

Bihar Election 2025: जागावाटपात भाजपची कोंडी कायम; JDU ची १०३ उमेदवारांची यादी अंतिम, ‘या’ महत्त्वाच्या जागांवर मोठा ‘गेम’?

Bihar Election 2025: ‘राहुल गांधींचे जे हाल झाले तेच…’; प्रशांत किशोर थेट तेजस्वी यादवांना आव्हान देणार?
4

Bihar Election 2025: ‘राहुल गांधींचे जे हाल झाले तेच…’; प्रशांत किशोर थेट तेजस्वी यादवांना आव्हान देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.