Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

लोजपा (आर) प्रमुख चिराग पासवान हे शनिवारी सकाळी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ही बैठक सुमारे २५ ते ३० मिनिटे चालली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 16, 2025 | 09:51 AM
Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमधील प्रचंड विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू
  • सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
  • नितीश कुमार यांच्या भूमिकेबद्दल भाजपामध्ये असंतोष

Bihar Election 2025: बिहारमध्ये तब्बल बहुमताचा प्रचंड विजय मिळूनही सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्रीपदावर एकमत न झाल्याने भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांच्यात मंत्रिपद वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी भाजपकडून सुचवलेल्या काही उमेदवारांना थेट नकार दिला, ज्यामुळे मंत्रिमंडळ रचनेसंदर्भात किंवा सरकार स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. नितीश यांच्या भूमिकेबद्दल भाजपमध्ये असंतोष असल्याचेही वृत्त समोर येत आहे; मात्र बिहारच्या राजकारणातील नितीश कुमार यांची निर्णायक भूमिका लक्षात घेता भाजप त्यांना नाराज करण्याच्या मूडमध्ये नाही.

Explainer: RJDपेक्षा कमी मते मिळवूनही भाजपने जास्त जागा कशा जिंकल्या? कसे आहे निवडणुकीचे समीकरण

दरम्यान, सोमवारी उशिरा जेडीयूच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना पाटण्यात बोलावण्यात आले आहे. नितीश कुमार यांना सरकार स्थापनेची कोणतीही घाई नसल्याचे दिसत असून, ते भाजप नेत्यांशी चर्चेसाठीही उत्सुक नसल्याचे पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. बिहारच्या सत्ताकाठीचा तिढा अजून सुटलेला नसून दोन्ही पक्षांतील समन्वयाचा तोल आगामी काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

चिरागमुळे चर्चांना उधाण

लोजपा (आर) प्रमुख चिराग पासवान हे शनिवारी सकाळी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ही बैठक सुमारे २५ ते ३० मिनिटे चालली, त्यानंतर त्यानी माध्यमांना सांगितले की ही औपचारिक बैठक होती. ज्यामध्ये निवडणूक निकाल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चिराग म्हणाले की जदयु आणि लोजपा (आर) यानी अनेक जागांवर एकमेकांना पाठिंबा दिला आणि विजयाचे श्रेय संयुक्त प्रयत्नांना दिले. मुख्यमंत्रिपदाबद्दल विचारले असता, त्यांनी ते रालोआ नेतृत्वाबर सोपवले ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

मुहूर्त लांबणीवर चौधरींच्या नावावर आक्षेप

सूत्रांनुसार, जदयुकडून सम्राट चौधरी आणि अशोक बौधरी यांच्या नावांवर एकमत होताना दिसत नाही. जदयुच्या एका गटाचे मत आहे की, त्यांच्यावर आरोप आहेत. आरोप करणारा जनसुराज पक्ष निवडणुकीत खातेही उघडू शकला नाही, परंतु त्यांचे आरोप कायम आहेत. माणून, त्यांनी प्रथम आरोपांना उत्तर द्यावे. ते निदर्दोष ठरल्यानंतरच त्यांना सत्तेत घेतले पाहिजे. जदयुला याला सुशासनाचे एक उत्तम उदाहरण बनकण्याची इच्छा आहे. तथापि, भाजपाने याला विरोध केला आहे. कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वतः सम्राट चौधरींना एक प्रमुख चेहरा बनवण्याचा हेतू जाहीरपणे व्यक्त केला.

Bihar Assembly Election 2025: रोहिणी आचार्य यांचा RJD ला रामराम; तेजस्वी यादवांच्या दोन सहकाऱ्यांवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या खात्यांवरून संघर्ष

भाजपाने म्हटले की, मुख्यमंत्रिपदावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवाय, असे म्हटले जात आहे की बिहारमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भाजपाला गृह, उद्योग, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि वित्त ही मलाईदार खाती हवी आहेत. यापैकी गृहखाते सातत्याने मुख्यमंत्री नितीशकुमार याच्याकडे आहे, जदयु समर्थकांनी प्राप्न उपस्थित केला की वित्त, गृह, नगरविकास, उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम खाती भाजपाला दिली तर नितीशकुमार फक्त मुख्यमंत्रिपदावर सरकार कसे चालवतील? जदयुचा सर्वांत गंभीर आक्षेप गृह आणि वित्त मंत्रालयांबाबत आहे. शिवाय, विधानसभेच्या अध्यक्षांबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त आहे.

 

Web Title: Bihar election 2025 the time for formation of new government in bihar has been postponed what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!
1

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
2

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
3

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…

Bihar Election : ‘बिहारने दिलेला जनादेश हा मोदींवरील विश्वासाचा शिक्का’, डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
4

Bihar Election : ‘बिहारने दिलेला जनादेश हा मोदींवरील विश्वासाचा शिक्का’, डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.