Bihar Politics: बिहरामधील काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या मतदार अधिकार यात्रेमुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेनंतर भाजपकडून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या विरोधात काल बिहार बंदची हाक देण्यात आली. या बंदलाही संमिश्र प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घटनाक्रमानंतर राजद सुप्रीमो लालू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या बिहारी स्टाईलमध्ये ट्विटर एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. “अरे मोदीजी, तुम्हाला विजय हवाय बिहारमधून आणि तुम्ही कारखाने देताय गुजरातला, आता हा गुजराती फॉर्म्युला बिहारमध्ये चालणार नाही!”. (ऐ मोदी जी, विक्ट्री चाहिए बिहार से और फैक्ट्री दीजिएगा गुजरात में? ये गुजराती फार्मूला बिहार में नहीं चलेगा! #LaluYadav #RJD #Bihar) असे ट्विट करत त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे.
Mumbai Bomb Threat: मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस म्हणाले, ‘घाबरण्याची गरज नाही अलर्ट….’
राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या टीकेनंतर जेडीयूने प्रत्युत्तर दिले आहे. जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, “लालू प्रसाद यादव यांचे विचार विषारी आहेत आणि त्यांचे ट्विट देखील विषारी आहे. पण बिहार आता या विषारी टप्प्यातून बाहेर पडला आहे. गुजरात असो किंवा बिहार, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गुजराती आता ओझे राहिलेले नाही. लालू यादव चारवाहा विद्यालयाचे ज्ञान देतात. ते बिहारींचा अपमान करण्याबद्दल बोलतात. पण बिहारमधील लोक सर्वकाही समजून घेत आहेत. म्हणूनच लालू आज राजकीय नजरकैदेत आहेत.” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ऐ मोदी जी,
विक्ट्री चाहिए बिहार से और फैक्ट्री दीजिएगा गुजरात में?
ये गुजराती फार्मूला बिहार में नहीं चलेगा! #LaluYadav #RJD #Bihar pic.twitter.com/ulpz4bifyw
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) September 5, 2025
तसेच, “लालू यादव हे घाणेरडे आणि द्वेषपूर्ण विचारसरणीचे राजकारणी आहेत. त्यांनी आधी बिहारला उच्च आणि नीच असे विभागले. त्यांनी जातींमध्ये भांडणे लावली. आता ते राज्यनिहाय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारी आणि गुजरातीबद्दल बोलून द्वेषाचे हे राजकारण आता बिहारमध्ये चालणार नाही.” अंसही त्यांनी म्हटलं आहे.
आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार
राजद प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, “लालू प्रसाद यांनी बरोबर सांगितले आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात बिहारींना मारहाण होत असताना भाजप आणि एनडीएचे लोक गप्प का राहतात? लालूजी नेहमीच भारतातील एकतेबद्दल बोलतात. गुजरातच्या लोकांनी नितीश कुमार यांच्या डीएनएवर प्रश्न उपस्थित केले होते. बिहारींचा यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो?” अशी जहरी टिकाही तिवारी यांनी केली आहे.