१७ वी विधानसभा विसर्जित झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. आता ते दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
विरोधी महागठबंधनचा दारूण पराभव झाला. त्यात नामुष्की ओढवणाऱ्या पराभवानंतर लालू प्रसाद यांच्या कुटुंबात मोठी फूट पडली आहे. लालू प्रसाद यांना किडनी देणारी त्यांची मुलगी रोहिणी यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.
पहिल्या टप्प्यात एनडीएची विश्वासार्हता पणाला लागली असली तरी, भाजपाची खरी परीक्षा दुसऱ्या टप्प्यात आहे. शिवाय, केवळ राजदच नाही तर काँग्रेसलाही स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.
PM Modi on Bihar Elections: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन बिहारी जनतेला खास आवाहन केले आहे. आधी मतदान नंतर नाष्टा करा असे देखील पंतप्रधान मोदी बिहारी जनतेला…
14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत पीके यांना बिहारच्या राजकारणाच्या त्रिकोणाचा तिसरा कोन मानले जाऊ शकते का? जनतेमध्ये त्यांचा किती प्रभाव आहे? हा मूळ प्रश्न आहे.
आमच्या सरकारनंतर हे लोक एकही भरती मोहीम राबवू शकले नाहीत. आमचे स्वप्न आहे की बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात कारखाने सुरू व्हावेत, चांगली रुग्णालये आणि शाळा उभ्या राहाव्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता कर्पूरी ग्रामला भेट देतील आणि भारतरत्न दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर, ते त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील.
लालू यादव केंद्रात असो वा राज्यात, त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. बिहारचे लोक २१ व्या शतकात लालू यादव यांचे 'जंगल राज' कधीही परत आणणार नाहीत.
विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटपाची चर्चा सुरू असतानाच जेडीयूचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल सोमवारी अचानक मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी आले होते आणि सकाळी साडेआठ वाजल्यापासून तिथे वाट…
हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी अलीकडेच पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सीमांचलचा व्यापक दौरा केला आहे. त्यांनी तेथे अनेक जाहीरसभा घेतल्या आणि कार्यकत्यांशी नवीन राजकीय घडामोडींवर चर्चा केली.
प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध जाती-धर्मातील, क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
तेज प्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलापासून राजकीय प्रवास सुरू केला. महाआघाडी सरकारमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यातील 7.5 दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात 10000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील.
यंदाच्या निवडणुकीत देखील असदुद्दीन ओवैसी विधानसभेच्या किती जागा लढवतात आणि जिंकतात आणि त्यामुळे बिहारच्या राजकारणात काही उलथापालथ होणार का हे पहावे लागेल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने 115 आणि भाजपने 110 जागांवर उमेदवार उभे केले होते.
बिहारमधील महाआघाडीने 'अति मागासवर्गीय न्याय ठराव' जारी केला, ज्यामध्ये पंचायत आणि महानगरपालिका संस्थांमध्ये अत्यंत मागासवर्गीयांसाठी प्रमुख घोषणांचा समावेश आहे, जाणून घ्या