रांचीमध्ये थरार! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात; ४० मिनिटे हवेत अडकली Flight, नेमके काय घडले?
रांची: इंडिगोचे एक विमान पटणा वरुण रांचीकडे येत होते. या विमानात १७५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र या विमानाला एक पक्षी येऊन धडकला. त्यामुळे इंडिगोचे विमान आकाशात तब्बल ४० मिनिटे फिरत राहिले. मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवल्याने विमानाने सुरक्षितपणे लॅंडींग केले. सध्या या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
नेमके काय घडले?
इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान पटणाकडून रांचीकडे येत होते. अंतर या विमानाला अचानक एक पक्षी येऊ धडकला. त्यामुळे हे विमान तब्बल ४० मिनिटे हवेतच फिरत राहिले. या विमानातून १७५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान सुरक्षितपणे रांची एअरपोर्ट वर लँड केले. १७५ प्रवासी आणि पायलट हे सुखरूप असल्याचे समजते आहे.
४ हजार फुट उंचीवर होते विमान
रांची येथे विमानाला एक पक्षी येऊन धडकला. ही घटना घडली तेव्हा इंडिगोचे विमान ४ हजार फुट उंचीवर होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही.
टर्ब्युलन्समुळे इंडिगो फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग
दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E-2142 मध्ये आज खराब हवामानात तीव्र गोंधळ आणि वीज चमकल्याने गोंधळ उडाला. श्रीनगरवरून विमान जात असताना ही घटना घडली आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व २२७ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत आणि विमानाचे श्रीनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
इंडिगोचे परिपत्रक
या घटनेबाबत इंडिगोने अधिकृत निवेदन जारी केले आणि म्हटले की, “दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान 6E-2142 ला अचानक गारपीट झाली. विमान आणि केबिन क्रूने स्थापित प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमान श्रीनगरमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानाच्या आगमनानंतर, विमानतळ पथकाने ग्राहकांची काळजी घेतली आणि त्यांच्या कल्याणाला आणि आरामाला प्राधान्य दिले. आवश्यक तपासणी आणि देखभालीनंतर विमान सोडण्यात येईल.”
उत्तर भारतातील हवामानात बदल
या घटनेमुळे, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामान अचानक बदलले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, या भागात जोरदार वारे, गडगडाटी वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभराच्या कडक उन्हानंतर, दिल्लीत ताशी ६० किमी वेगाने वारे आणि संध्याकाळी पाऊस पडला, ज्यामुळे तापमानात घट नोंदली गेली.