Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bisleri Statement On FSSAI Prosecution: महिने जुने प्रकरण, १४३ प्लांट्सपैकी गोवा युनिटचा उल्लेख; बिस्लेरीचे स्पष्टीकरण

Bisleri Statement On FSSAI Prosecution : ३० सप्टेंबर २०२५ रोजी, FSSAI ने गोवा युनिटमधून सहा नमुने गोळा केले. प्राथमिक चाचणीत असे आढळून आले की पाच नमुने सर्व विहित मानकांची पूर्तता करत होते. सहाव्या नमुन्यात ब्रोमेटची पातळी प्रति लिटर १२ मायक्रोग्रॅम होती, तर विहित मर्यादा प्रति लिटर १० मायक्रोग्रॅम होती.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 23, 2026 | 02:50 PM
Bisleri, FSSAI, Food Safety, Business News, Goa News, Consumer Health, National News

Bisleri, FSSAI, Food Safety, Business News, Goa News, Consumer Health, National News

Follow Us
Follow Us:
  • FSSAI कडून बिस्लेरीवर खटला चालवण्यास मंजुरी
  • दोन चाचण्यांमध्ये बिस्लेरीच्या पाण्यात कॅन्सरचे घटक
  • बिस्लेरीकडून अधिकृत स्पष्टीकरण
 

Bisleri Statement On FSSAI Prosecution: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)ने बिस्लेरीच्या पाण्याच्या केलेल्या दोन चाचण्या अयशस्वी ठरल्या. यात पहिल्या चाचणीत ब्रोमेटची पातळी निश्चित मर्यादेपेक्षा (१० मायक्रोग्राम प्रति लिटर) जास्त, म्हणजेच १२ मायक्रोग्राम प्रति लिटर असल्याचे आढळून आले. तर दुसऱ्या चाचणीत ब्रोमेट आणि PAHs दोन्ही कर्करोगास कारणीभूत असलेले घटक आढळून आले. यानंतर एफएसआयने

बिस्लेरीच्या अपीलानंतर, नमुना एका संदर्भ प्रयोगशाळेत पाठवण्यात आला, जिथे ब्रोमेट अनुज्ञेय मर्यादेत असल्याचे आढळले, परंतु पॉलिन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) च्या उपस्थितीमुळे नमुना पुन्हा असुरक्षित ठरवण्यात आला.

Air Ambulance: एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती

बिस्लेरी वॉटरवर कायदेशीर कारवाईसाठी मंजुरी

एफएसएसएआयने (FSSAI) अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत कंपनीवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. तथापि, अद्याप कोणत्याही विशिष्ट बॅचवर देशव्यापी रिकॉल किंवा बंदी जाहीर करण्यात आलेली नाही. बिस्लेरीने आता एएनआय (ANI) द्वारे एक निवेदन जारी करून, सर्व आरोपांचे खंडन केले आहे आणि खालील युक्तिवाद सादर केले आहेत.

बिस्लेरीने आता सर्व आरोपांवर अधिकृतपणे स्पष्टीकरण

अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडवर खटला चालवण्यास एफएसएसएआयने (FSSAI) मंजुरी दिल्यानंतर, कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. बिस्लेरीच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या नमुन्याने सुरक्षा चाचण्यांमध्ये अपयश आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आम्हाला मिळालेल्या अलीकडील माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिस्लेरीला नोटीस बजावली आहे. हे प्रकरण सुमारे १४ महिने जुने असून ते सप्टेंबर २०२५ मध्ये बिस्लेरीच्या गोवा येथील उत्पादन युनिटमध्ये (आमच्या नेटवर्कमधील १४३ प्लांटपैकी एक) उत्पादित केलेल्या एका बॅचशी संबंधित आहे.

FSSAI Action Against Bisleri: बापरे…! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा

संपूर्ण प्रकरण काय आहे?

३० सप्टेंबर २०२५ रोजी, FSSAI ने गोवा युनिटमधून सहा नमुने गोळा केले. प्राथमिक चाचणीत असे आढळून आले की पाच नमुने सर्व विहित मानकांची पूर्तता करत होते. सहाव्या नमुन्यात ब्रोमेटची पातळी प्रति लिटर १२ मायक्रोग्रॅम होती, तर विहित मर्यादा प्रति लिटर १० मायक्रोग्रॅम होती. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी बिस्लेरीने केलेल्या अपीलानंतर, FSSAI ने तो नमुना पुनर्तपासणीसाठी एका संदर्भ प्रयोगशाळेत पाठवला.

संदर्भ प्रयोगशाळेच्या चाचणीत ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत आढळली, परंतु नमुन्यात पॉलीॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) ची उपस्थिती देखील नोंदवली गेली. ही तफावत लक्षात घेता, बिस्लेरीला स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटले. बिस्लेरीने FSSAI-मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत त्याच नमुन्याची स्वतंत्र चाचणी करवून घेतली. या चाचणीतही ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत असल्याचे आढळले.

FSSAI च्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाला एक औपचारिक पत्र

बिस्लेरी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडून २ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या औपचारिक पत्रासह स्वतंत्र चाचणीचे निकाल FSSAI च्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाला सादर केले आहेत. तेव्हापासून आम्हाला FSSAI कडून कोणतीही पुढील माहिती मिळालेली नाही, त्यामुळे आम्ही हे प्रकरण बंद झाले आहे असे गृहीत धरले.

आजपर्यंत, बिस्लेरीला ईमेलद्वारे किंवा छापील स्वरूपात कोणतीही सूचना मिळालेली नाही, तसेच FSSAI च्या वेबसाइटवरही अशी कोणतीही सूचना दिसलेली नाही. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता हे बिस्लेरीसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही आमच्या १०-टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान ९० हून अधिक कठोर गुणवत्ता चाचण्या करतो. योग्य नियामक प्रक्रियेद्वारे हे प्रकरण सोडवण्यासाठी आम्ही FSSAI सोबत सहकार्य करत राहू. बिस्लेरी, अनेक वर्षांपासून एक विश्वासार्ह ब्रँड असून, पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

 

 

Web Title: Bisleri water sample test pahs bromate referral lab report company statement as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.