Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वपक्षातील नेत्यामुळे ‘हे’ उपमुख्यमंत्री तुरुंगात जाणार? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…

भाजप नेते आणि आरटीआय अधिकाऱ्याने ही याचिका दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वी हायकोर्टाने याचिकेत तथ्य नसल्याने याचिका फेटाळून लावली होती. याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याने याचिका रद्द करण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2025 | 05:40 PM
स्वपक्षातील नेत्यामुळे ‘हे’ उपमुख्यमंत्री तुरुंगात जाणार? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…
Follow Us
Close
Follow Us:

लखनौ: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री तर केशव प्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री आहेत. आता उत्तर प्रदेश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असणारे केशव प्रसाद मौर्य यांच्या अडचि वाढण्याची शक्यता आहे.

भाजपमधील एका नेत्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यनाहकीय विरोधात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून केशव प्रसाद मौर्य यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. हायकोर्टाने ही याचिका स्वीकार केली आहे. याचिकेतील आरोप खरे ठरल्यास केशव प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कदाचित त्यांना तुरुंगात जावे लागू शकते असे म्हटले जात आहे.

अलाहाबाद हायकोर्टाने केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधातील याचिका स्वीकार केली आहे. याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे. खोट्या पदवीच्या आधारावर केशव प्रसाद मौर्य यांनी ५ निवडणूक लढवल्या आहेत असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. त्यांनी बनावट पदवीच्या आधारे कौशांबी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून पेट्रोल पंप मिळवला, असा आरोप करण्यात आला आहे.

भाजप नेते आणि आरटीआय अधिकाऱ्याने ही याचिका दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वी हायकोर्टाने याचिकेत तथ्य नसल्याने याचिका फेटाळून लावली होती. याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याने याचिका रद्द करण्यात आली होती. त्यानंतर याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. तसेच याचिकाकर्त्याळा पुन्हा हायकोर्टात जाण्यास सांगितले. यानंतर पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका अलाहाबाद हायकोर्टाने स्वीकारली आहे.

केशव प्रसाद मौर्य यांच्यावर नक्की काय आरोप आहेत? 

भाजप नेते आणि आरटीआय कार्यकर्त्याने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या विरोधात काही आरोप करत अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अलाहाबाद हायकोर्टने ही याचिका स्वीकारली आहे. ६ मे ला यावर सुनावणी होणार आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी २०१४ मध्ये फुलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांच्याकडे ‘बीए’ पदवी असल्याचे जाहीर केले होते, असा दावा आरटीआय कार्यकर्त्याने याचिकेत केला  आहे. १९९७ मध्ये त्यांनी हिंदी साहित्य संमेलनातून बीए केल्याचे दाखवण्यात आले होते. उपमुख्यमंत्र्यांनी २००७ मध्ये प्रयागराजच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

केशव प्रसाद मौर्य यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांनी हिंदी साहित्य संमेलनातून १९८६ मध्ये प्रथमा पदवी, १९८८ मध्ये मध्यम पदवी आणि १९९८ मध्ये उत्तम पदवी मिळवल्याचे नमूद केले. काही राज्यांमध्ये, प्रथमा पदवी हायस्कूलच्या समतुल्य मानली जाते, मध्यम पदवी इंटरमिजिएटच्या समतुल्य मानली जाते आणि उत्तम पदवी पदवीच्या समतुल्य मानली जाते. हिंदी साहित्य संमेलन बीएची पदवी देत ​​नाही. त्यामुळे शपथपत्रात दिलेली माहिती चुकीची आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Bjp leader file petition in allahabad high court against uttar pradesh dcm keshav prasad mourya political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Allahabad High Court
  • Deputy Chief Minister
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
1

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
2

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान
3

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य
4

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.