नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वी लॅंडींगनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्वप्रथम या मोहिमेतील सर्व वैज्ञानिकांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर देशभरातील सर्व जनतेला त्यांनी या यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत हा चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर पोहचणारा पहिला देश बनला आहे. तर चंद्रावर लॅंडींग करणारा चौथा देश बनला आहे. असेही गौरवोद्गार जेपी नड्डा यांनी सांगितले.
#WATCH | On Chandrayaan-3's successful landing on the Moon, BJP President JP Nadda says, "I congratulate all scientists associated with this mission and the people of the county. Under PM Modi's leadership, India is creating a unique identity for itself in the space sector. This… pic.twitter.com/ONpLG3Wt7j
— ANI (@ANI) August 23, 2023
देशासाठी अभूतपूर्व यश
यावेळी जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचेसुद्धा कौतुक करीत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे यश देशाला प्राप्त करून देऊ शकलो. या यशस्वी लँडिंग मिशनमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले राष्ट्र ठरले आहे. ही देशासाठी एक विलक्षण कामगिरी आहे.
47 अंतराळ मोहिमा मोदी सरकारच्या अंतर्गत
89 प्रक्षेपण मोहिमांपैकी इस्रोने 1969 मध्ये स्थापन केल्यापासून, 47 अंतराळ मोहिमा मोदी सरकारच्या अंतर्गत गेल्या 9 वर्षात केल्या आहेत. ही UPA राजवटीत सुरू करण्यात आलेल्या मोहिमांच्या दुप्पट आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडींगबद्दल या मिशनमध्ये जोडलेल्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या चांद्रयान 3 मोहिमेचा अखेरचा टप्पा सुरू असताना, सगळ्यांच्या नजरा भारताकडे होत्या. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. आज केवळ भारतच नाही तर जगभरात चांद्रयान 3 ची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाची चंद्र मोहीम अयशस्वी झाली. आता सर्वांच्या नजरा चांद्रयान 3 वर लागल्या आहेत आणि संपूर्ण जग यासाठी प्रार्थना करीत होते. परंतु, भारताच्या यशाने भविष्यात या कामगिरीचे सुवर्णक्षरात लेखन केले जाईल.