कुस्तीपटूंच्या (Wrestler) लैंगिक शोषणप्रकरणी (Sexual Abuse) दिल्ली पोलिसांचा तपास आता तीव्र झाला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan singh) हे लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरले गेले असून त्यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहून आपले म्हणणे नोंदवले. यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रश्नोत्तरांच्या वेळी त्याने सर्व आरोप फेटाळून लावत स्वत:ला निर्दोष घोषित केले.
[read_also content=”भिवंडीत तब्बल 805 इमारती धोकदायक; हजारो कुटुंब धोक्यात, जीव मुठीत घेऊन जगत आहेत लोकं https://www.navarashtra.com/maharashtra/805-building-decelerated-as-fraudulent-thousand-people-people-life-is-in-danger-nrps-398148.html”]
बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाशी संबंधित प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिस विविध ठिकाणांहून पुरावे (फोटो-व्हिडिओ) गोळा करत आहेत. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंशी संबंधित प्रकरणांचा तपशीलवार तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. एसआयटीमध्ये विविध शाखांमधील पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारींच्या आधारे अनेक राज्यांना भेटी देऊन या प्रकरणाशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे.
तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि अनुभवी विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. 23 एप्रिलपासून कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल आले. बृजभूषणशरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिल रोजी एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंनी नोंदवलेल्या तक्रारींच्या आधारे बृजभूषण विरुद्ध दोन एफआयआर नोंदवले होते. यानंतरही कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे.