By Poll Elections: केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या १९ जून रोजी मतदान होणार असून २३ जून रोजी मतमोजणी होईल,अशी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील ५ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. काही नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे आणि काही नेत्यांच्या मृत्यूमुळे विधानसभेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत. त्यात गुजरातमधील काडी आणि विसावदर विधानसभा जागा समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे केरळमधील निलांबूर विधानसभा मतदारसंघ, पंजाबमधील लुधियाना आणि पश्चिम बंगालमधील कालीगंज विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दिल्लीत एकत्र येणार; नेमकं काय आहे कारण?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी उद्या म्हणजे २६ मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. नामांकनाची शेवटची तारीख २ जून आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ३ जून रोजी होईल. उमेदवारांना ५ जूनपर्यंत नावे मागे घेण्याची संधी असेल. या जागांवर सर्व निवडणूक प्रक्रिया २५ जूनपूर्वी पूर्ण कराव्या लागतील.
राज्य निवडणूक आयोगाने बिहारमध्येही निवडणुका जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून शनिवारी (२४ मे) सहा नगरपालिका संस्थांमधील सार्वत्रिक निवडणुका तसेच ५१ नगरपालिका संस्थांमधील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. २८ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. ज्या महापालिका क्षेत्रात आणि ज्या वॉर्डांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २८ मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामांकन प्रक्रिया सुरू होईल. नामांकनाची शेवटची तारीख ५ जून निश्चित करण्यात आली आहे.
184 मिलियनहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डेटा लीक! Apple, Facebook, Snapchat युजर्सचा समावेश
नामनिर्देशन पत्रांची छाननी ६ जून ते ९ जून या कालावधीत केली जाईल. उमेदवारांची नावे मागे घेण्याची अंतिम तारीख १० ते १२ जून निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर, उमेदवारांना १३ जून रोजी निवडणूक चिन्ह मिळेल. २८ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल आणि ३० जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल.