184 मिलियनहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डेटा लीक! Apple, Facebook, Snapchat युजर्सचा समावेश
हॅकिंग आणि स्कॅमिंगच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 184 मिलियनहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डेटा लीक झाल्याचं सांगितलं आहे. डार्क वेबवर 19 अरब पासवर्ड्स लिक झाल्याचं सांगितलं जात आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे की, हे पासवर्ड सायबर गुन्हेगारांनी अगदी कमी पैशांत खरेदी केले आहेत. 22 मे रोजी, मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल क्राइम्स युनिटच्या नेतृत्वाखालील जागतिक ऑपरेशनचा भाग म्हणून, सर्वात धोकादायक पासवर्ड चोरी करणाऱ्या टूल्सपैकी एक, लुम्मा स्टीलर बंद करण्यात आले आहे.
18 करोड 41 लाख 62 हजारहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डिटेल्स कोणत्याही सुरक्षिततेशिवाय इंटरनेटवर उघडपणे उपलब्ध असल्याचे आढळले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लिक्समध्ये Apple, Facebook, Instagram, Snapchat आणि Roblox सारख्या प्लॅटफॉर्म्सच्या यूजर्सचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या युजर्सच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असल्याची चर्चा सुरु आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डार्क वेबवर चोरी झालेला डेटा मिळणं अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात पासवर्ड आणि यूजर लॉगिन वेब होस्टिंग प्लॅटफॉर्मवर उघडपणे साठवले जातात, तेव्हा प्रकरण अधिक गंभीर बनते. कारण यामुळे युजर्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आणि यूजर्सना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं.
समोर आलेल्या घटनांमधील डेटाबेस 47.42 GB होता. यामध्ये 84,162,718 यूनिक लॉगिन्स आणि पासवर्ड्स होते. याचा उद्देश नेमका काय होता, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. होस्टिंग कंपनीने मालकाची माहिती देखील सार्वजनिक केलेली नाही. पण ज्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आहे तो एक प्रसिद्ध सायबर सुरक्षा संशोधक जेरेमिया फाउलर आहे. त्याने सांगितले की हा डेटा कदाचित एखाद्या इन्फोस्टीलर मालवेअरने गोळा केला असेल. मात्र हा डेटा गोळा करण्याचे उद्देश अद्याप समोर आलेला नाही. Fowler ने असं देखील सांगितलं आहे की, केवळ सोशल मीडिया अकाउंट्स नाही तर बँकिंग, हेल्थ आणि सरकारी पोर्टल्ससंबंधित लॉगिन्स देखील यामध्ये सहभागी आहे. ज्यामुळे युजर्सच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.