Chandrababu Naidu in touch with Rahul Gandhi...; Former Chief Minister's revelations, hints of a new earthquake
चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात
जगनमोहन रेड्डींचा खळबळजनक दावा
चंद्राबाबू नायडू यांनी सत्तेसाठी अत्याचार केले
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख नेते जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. “चंद्राबाबू नायडू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत हॉटलाइनवर राहुल गांधींच्या संपर्कात आहेत.”असा दावा जनगमोहन रेड्डी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात मोठ्या भुकंपाच्या शक्यतेचे संकेत दिले आहेत.
एकीकडे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले आहेत. त्यावरून देशभरात राजकारण तापलं असताना जगनमोहन रेड्डी यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. माध्यमांशी संवाद साधताना जगनमोहन रेड्डी म्हणाले की,”जेव्हा राहुल गांधी मत चोरीबद्दल बोलतात, तेव्हा ते आंध्र प्रदेशाबद्दल विधान का करत नाहीत. आंध्रप्रदेशात घोषित निकाल आणि मतमोजणीच्या दिवसांच्या निकालांम्ये सर्वाधित १२.५ टक्क्यांचा फरक आहे. ते अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल का बोलत नाहीत? तर अरविंद केजरीवाल हे स्वतः आमदारकीची निवडणूक हरले. तर त्यांनी असे केलेच नसते.”
ते पुढे म्हणाले, ”राहुल गांधी आंध्रबद्दल बोलत नाहीत कारण चंद्राबाबू नायडू रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून हॉटलाइनवर राहुल गांधींच्या संपर्कात आहेत… राहुल गांधींसारख्या व्यक्तीवर मी काय भाष्य करावे, जो स्वतः त्यांच्या कामाशी प्रामाणिक नाही?” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
जगनमोहन रेड्डी यांनी पुलिवेंदुला आणि वोंटिमिट्टा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर “लोकशाही कमकुवत करण्याचा” आरोप केला.चंद्राबाबू नायडू यांनी सत्ता मिळवण्यासाठी “षड्यंत्र, हल्ला, अत्याचार, खोटेपणा आणि फसवणूक” केल्याची टीका त्यांनी केली .
एक्सवरील एका पोस्टमध्ये, जगन यांनी म्हणाले की, नायडू, जनतेचा पाठिंबा मिळवण्याऐवजी “पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांच्या अधिकाराचा फायदा घेऊन सत्तेचा गैरवापर करत आहे. पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून “पोलिसांचे अत्याचार सुरू झालेत, आणि शेकडो पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले, ज्यांपैकी अनेकांवर पूर्वी कोणतेही गुन्हे नव्हते, अशा कार्यकर्त्यांवरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
दरम्यान, वायएस जगनमोहन रेड्डी यांनी पुलिवेंदुला आणि वोंटिमिट्टा जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ (झेडपीटीसी) पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या या निवडणुका “अलोकतांत्रिक आणि मनमानी पद्धतीने” घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ताडेपल्ली येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रेड्डी म्हणाले, “या दोन्ही पोटनिवडणुका त्वरित रद्द करून केंद्रीय दलांच्या संरक्षणाखाली पुन्हा घेण्यात याव्यात.”
त्यांनी आरोप केला की, तेलुगू देशम पक्षाच्या (टीडीपी) नेतृत्वाखालील एनडीए सरकारने वायएसआरसीपीच्या मतदान प्रतिनिधींना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले. तसेच मतदारांना मतदानापासून परावृत्त करण्यासाठी धमकावण्यात आले आणि मतांमध्ये फसवणूक करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. तसेच, ते आणि या पोटनिवडणुकीत उभे असलेले त्यांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार न्यायालयीन लढा देणार आहेत.