थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Parents Throws Child from Terrace : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी विचत्र, तर कधी मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, भांडणे, जुगाड यांसारखे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके धक्कादायक असतात की पाहून राग अनावर होतो, तर काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून हसून पोट दुखून येते. सध्या एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका बाळासोबत पालकांनी धक्कादाकय स्टंटबाजी केली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी पालकांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका आईने आपल्या पोटच्या जीवाला गच्चीवर खाली चेंडूसारखे फेकले आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. काही महिला गच्चीवर उभ्या आहेत. यामध्ये एका महिलेच्या हातात बाळ आहे. तसेच घराच्या खाली काही चिमुकले खेळत आहे. इथेच एक पुरुष देखील उभा आहे. अचानक महिला आपल्या खाली लटकवते आणि छतावरुन फेकते. खाली उभा असलेला माणूस बाळाला चेंडू झेलतात तसे झेलतो. असे दिसत आहे की, याची त्यांना रोजची सवयच आहे. पण थोडीशी जरी चूक घडली असती तर बाळ खाली पडले असते आणि त्याला गंभीर दुखापत झाली असतील. सध्या या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अभिमानास्पद! अमेरिकन मुलाने गायले भारताचे राष्ट्रगीत; व्हिडिओ पाहून कराल कौतुक, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hasi.toh.fasi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या धक्कादायक व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी यावर संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “अल्लाहच्या देणगीला मशीन सारखे समजत आहेत”, असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “यांना काय फरक पडणार आहे, यांचे तर ४०-५० मुले असतात”, असे म्हटले आहे. आणखी एका युजरने “असे पालक असण्यापेक्षा मुलांनी अनाथ असलेले चांगले”, असे म्हटले आहे. सध्या या पालकांवर कारवाईची मागणी देखील केली जात आहे. पण हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.