chandrayaan photo
सध्या संपूर्ण देशाचंच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष लागून असलेल्या चांद्रयान-3 मोहिमेचा (Chandrayaan-3 ) काउंटडाऊन सुरु झाला आहे. या ऐतिहासिक प्रक्षेपणाची देश आतुरतेने वाट पाहत आहे. ‘चांद्रयान-३’ शुक्रवारी (१४ जुलै) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपित होणार आहे. चांद्रयान-2 लाँच झाल्यानंतर तब्बल 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी आज भारत चांद्रयान-3 मिशन लॉन्च करणार आहे. LVM3-M4 रॉकेटद्वारे ते अवकाशात पाठवण्यात येईल. सध्या या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. ‘चांद्रयान-३’ ला अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू असून सध्या क्रायोजेनिक स्टेजचे प्रोपेलेंट फिलिंग केले जात आहे.
[read_also content=”चिमुकल्याची महाकाय अजगरसोबत मैत्री! अंगाखांद्यावर खेळतोय, हाताने जबडा उघडतोय; Video पाहून भरेल धडकी https://www.navarashtra.com/viral/child-playing-with-giant-python-shocks-people-calls-parents-irresponsible-nrps-431657.html”]
चांद्रयान-3 चे बजेट सुमारे 615 कोटी रुपये आहे, म्हणजे काही दिवसापुर्वी प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष चित्रपटाचं ऐकूण बजेट 700 कोटी रुपये होतं. म्हणजे चांद्रयान-3 या चित्रपटाच्या किमतीपेक्षा 85 कोटी रुपये स्वस्त आहे. 4 वर्षांपूर्वी पाठवलेल्या चांद्रयान 2 चा खर्चही 603 कोटी रुपये होता. मात्र, त्याच्या लॉन्चिंगसाठी 375 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
पूर्णपणे नियंत्रण लँडिंग अपेक्षित
चांद्रयान-3 प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या जवळपास पोहोचल्यानंतर, लँडरपासून विभक्त होण्यापूर्वी ते 100 किमी वर्तुळाकार ध्रुवीय चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. प्रगत सेन्सर्स आणि लँडिंग सिस्टिमने सुसज्ज लँडर दक्षिण ध्रुवीय प्रदेशात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. नियोजनानुसार, टचडाउन वेग 2 m/s पेक्षा कमी अनुलंब आणि 0.5 m/s क्षैतिज लक्ष्यित आहे, जे पूर्णपणे नियंत्रित लँडिंग असणे अपेक्षित आहे.
आजच दुपारी 2.35 वाजत प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्याच (इस्रो) नाही तर संपूर्ण देशाच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरून चांद्रयान-3 अवकाशात झेपावणार आहे. चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चांद्रमोहीम आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या या मोहिमेतील महत्त्वाचा वाटा मुंबईनं उचलला आहे.
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण इस्रोच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर थेट दाखवले जाईल. तुम्ही दूरदर्शनवर चांद्रयान-३ चे प्रक्षेपण थेट पाहू शकता. ज्यांना सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच व्ह्यू गॅलरीमधून प्रक्षेपण थेट पहायचे आहे, त्यांच्यासाठी स्पेस एजन्सीने ivg.shar.gov.in/ येथे नोंदणी सुरू केली आहे. आता नोंदणी बंद आहे.