
MP Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या आणि आता मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतच्या CISF च्या महिला जवानाकडून कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. चंदीगढच्या विमानतळावर कंगनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर काहीतरी बोलल्याने तेथील महिला CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावल्याने त्याची मोठी चर्चा झाली आहे. अखेर या महिला जवानला अटक करण्यात आली आहे.
#WATCH | BJP leader and actor Kangana Ranaut arrives at Delhi airport A constable-rank CISF officer allegedly slapped Kangana at Chandigarh Airport during a frisking argument. An inquiry committee comprising senior CISF officers has been set up to conduct a further… pic.twitter.com/kUHmg7PsAs — ANI (@ANI) June 6, 2024
सीआयएसएफच्या महासंचालकांना दिली कल्पना
कंगना रणौत दिल्लीत पोहोचली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिने सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांना या घटनेची माहिती दिली आहे. कंगनाने दावा केला आहे की, कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने तिच्याशी वाद घातला आणि चंदीगड विमानतळावर पडद्याच्या भागात तिला थप्पड मारली. कॉन्स्टेबल कुलविंदरला सीओ रूममध्ये ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
सीआयएसएफकडून सीसीटीव्हीद्वारे तपास
चंदीगड विमानतळावर सीआयएसएफकडून सीसीटीव्ही तपासले जात आहेत. बॉलीवूडची धडाकेबाज क्वीन कंगना राणौत आता राजकारणाचीही राणी बनली आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार कंगना रणौत विजयी झाल्या आहेत. कंगनाने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि विद्यमान खासदार पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून विजयाचा झेंडा फडकावला आहे.
भाजपच्या वतीने निवडणुकीत उभी राहिलेली कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून जिंकली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चित्रपट जगतातील अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, दक्षिणेतील अभिनेते सुरेश गोपी यांनी त्रिशूर मतदारसंघ जिंकून केरळचे पहिले भाजप लोकसभा खासदार म्हणून इतिहास रचला. मंडीतून विजय प्राप्त करीत कंगनाने तिच्या विरोधकांचे तोंड बंद केले आहे.
तेलुगू अभिनेता आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी पिठापुरममधून ७०,००० हून अधिक मतांनी विजय मिळवला. आता कंगनाच्या या विजयाबद्दल बॉलिवूडमधून तिचे पहिले अभिनंदन करण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी कंगनाचे मंडीतील विजयाबद्दल अभिनंदन केले.
अनुपम खेर यांनी दिल्या शुभेच्छा
अनुपम खेर यांनी कंगनाचा तिच्या आईसोबतचा व्हिडिओ शेअर करताना तिला रॉकस्टार म्हटले आहे. त्याने लिहिले: “माझ्या प्रिय कंगना! तुमच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन! तू रॉकस्टार आहेस. तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे! तुमच्यासाठी आणि मंडी आणि हिमाचल प्रदेशातील लोकांसाठी खूप आनंद झाला. तुम्ही वेळोवेळी हे सिद्ध केले आहे की जर एखाद्याने कठोर परिश्रम केले तर काहीही शक्य आहे. विजयी व्हा!