CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा,
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मतदार यादी सुधारणा प्रक्रिया (SIR) आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात सीजेपीने १० ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली आहे. त्या आंदोलनासाठी आज सकाळी अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास आणि इतर सहकारी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. पण काही मिनिटांपूर्वीच आयजीआय विमानतळावर उतरलेल्या अभिजीत दीपके यांना घेऊन जाणाऱ्या विमानात दिल्ली पोलिसांचे जवान चढले. अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले, यावेळी विमानात मोठा ड्रामाच झाल्याचे पाहाला मिळाले.
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना सोबत येण्याची विनंती केली. त्यावर, मी येथे अटक होण्यासाठीच आलो आहे. मला अटक करा.” असा संतापच त्यांनी दिल्ली पोलिसांसमोर व्यक्त केला. त्यावर “नाही, ही अटक नाही. कृपया सहकार्य करा.” अशी प्रतिक्रीया दिल्ली पोलिसांनी दिला. पोलिसांनी त्या तिघांना विमानातून उतरवून बसमध्ये नेले. सीजेपीने अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सूत्रांनुसार, अभिजीत दीपके आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. विमानात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर अभिजीत दीपके यांनी आक्षेप घेतला. एक महिला पोलीस अधिकारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी आल्या होत्या. महिला पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच अभिजीत दीपके उभे राहिले आणि त्यांनी हात जोडले. त्यानंतर दीपके म्हणाले, “चला, मी अटक करून घेण्यासाठी आलो आहे.” “भारत माता की जय” आणि “इन्किलाब जिंदाबाद”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.
विमानातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते विचारतात, “तुम्ही विमानात कशा आलात? तुमच्या पुरुष अधिकाऱ्यांना पुढे पाठवा.” दरम्यान, महिला पोलीस अधिकारी आग्रह करत होत्या, “चला.” त्याचवेळी, आशुतोष रांका यांनी विचारले, “महिला पोलीस अधिकारी का येत आहेत? तुमच्या पुरुष अधिकाऱ्यांना पाठवा.” अभिजीत दीपके यांनी उत्तर दिले, “अहो, मी अटक करून घेण्यासाठी आलो आहे. मला माझी बॅग घेऊ द्या. तुम्ही मला कोणत्या तुरुंगात टाकणार आहात?”
LIVE CJP Protest LIVE Updates: सीजेपी’चे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
यानंतर, दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने त्यांना ताब्यात घेऊन एका नजरकैद केंद्रात नेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तिघांना विमानतळावरून नेण्यात आले. पोलिसांनी त्यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून वाचवत नजरकैद केंद्रापर्यंत नेल्याची माहिती आहे. त्या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. ते नजरकैद केंद्रातच राहतील, परंतु त्यांना एका दुर्गम ठिकाणी नेण्यात आले आहे.
दरम्यान, सीजेपी, म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीने, या कारवाईला त्यांच्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा दावा करत तिन्ही नेत्यांच्या तात्काळ आणि बिनशर्त सुटकेची मागणी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) नावाखाली मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आणि ‘फॉर्म ६’ या मतदार नोंदणी दस्तऐवजातील बदलांना दोन सहकारी निवडणूक आयुक्तांनी केलेला विरोध डावलल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून मुख्य न्यायमूर्तींनी जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे.






