एलपीजीच्या किंमती, क्रेडिट कार्डचे नियम...; 1 नोव्हेंबरपासून 'हे' 6 मोठे बदल होणार?
नवी दिल्ली : ऑगस्ट संपून आता सप्टेंबर सुरु होत असतानाच महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. त्यात आता तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर जरी वाढले असले तरी घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ अथवा कपात केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
1 सप्टेंबर 2024 रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढवली आहे. कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही, मात्र, 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर महाग झाला आहे. IOCL च्या वेबसाइटनुसार, हे दर आज, 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ केली आहे.
दिल्लीत त्याची किंमत 1611 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये हा सिलिंडर 1802 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 1644 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत 1855 रुपये झाली आहे.
असे होते यापूर्वीचे दर…
1 ऑगस्ट रोजी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1652.50 रुपये होती, तर कोलकात्यात 1764.50 रुपये, मुंबईत 1605 रुपयांना सिलेंडर उपलब्ध होते. चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत 1817 रुपये होती. 1 जुलै रोजी दिल्लीत 1646 रुपये, कोलकात्यात 1756 रुपये, मुंबईत 1598 रुपये, चेन्नईमध्ये 1809 रुपये सिलेंडर होता.
हेदेखील वाचा : गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात…; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?