Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Montha : ओडिशात आज धडकेल मोंथा चक्रीवादळ; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, विमानसेवेला फटका

समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू राहिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2025 | 07:17 AM
Cyclone Montha : ओडिशात आज धडकेल मोंथा चक्रीवादळ; पश्चिम बंगालसह तमिळनाडूत मुसळधार पाऊस होणार

Cyclone Montha : ओडिशात आज धडकेल मोंथा चक्रीवादळ; पश्चिम बंगालसह तमिळनाडूत मुसळधार पाऊस होणार

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात उद्भवलेले चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले. मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडा येथून जाताना 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. यामुळे अनेक ठिकाणी घरे आणि झाडांची पडझड झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवारी सकाळी मोंथा ओडिशात पोहोचण्याची शक्यता आहे. मोंथा तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाला. परिणामी, समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू राहिला. यामुळे किमान ५२ उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 120 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या वादळामुळे कोनासीमा जिल्ह्यातील मकानागुडेम गावात एका महिलेचा मृत्यू झाला. राज्यात ३८००० हेक्टरवरील उभी पिके आणि १.३८ लाख हेक्टरवरील बागायती पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सुमारे ७६००० लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…

मोंथामुळे ओडिशातील 15 जिल्ह्यांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असलेल्या ओडिशा सरकारने आधीच 800 मदत केंद्रे स्थापन केली आहेत. किनारी भागात एनडीआरएफ पथके देखील पूर्णपणे सज्ज आहेत. मोंथाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी 45 पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये आंध्र प्रदेशात १०, ओडिशात ६, तामिळनाडू आणि तेलंगणात प्रत्येकी ३, छत्तीसगडमध्ये २ आणि पुद्दुचेरीमध्ये १ पथकाचा समावेश आहे.

समुद्रकिनारी न जाण्याचा प्रशासनाचा सल्ला

लोकांना समुद्राजवळ जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळग्रस्त भागातील रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक बुधवार सकाळपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चक्रीवादळ मोंथाबाबत सरकारी यंत्रणा सज्ज

केंद्र सरकारने चक्रीवादळ मोंथाला तोंड देण्यासाठी तयारीचा आढावा घेतला आहे, आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य उपायांवर चर्चा केली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय सेवेसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Web Title: Cyclone montha to hit odisha today heavy rains in many places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 07:09 AM

Topics:  

  • cyclone alert

संबंधित बातम्या

Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…
1

Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…

Cyclone Montha: चक्रीवादळ मोंथाचा Landfall, वेगाने सरकरणार आंध्रप्रदेशमध्ये; शाळा-कॉलेजला सुट्टी, अनेक ट्रेन्स रद्द
2

Cyclone Montha: चक्रीवादळ मोंथाचा Landfall, वेगाने सरकरणार आंध्रप्रदेशमध्ये; शाळा-कॉलेजला सुट्टी, अनेक ट्रेन्स रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.