मोंथा चक्रीवादळामुळे कोकणात पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
मोंथा चक्रीवादळामुळे राज्याला पावसाचा इशारा
कोकणात २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक बंद
भारतीय हवामान विभागाच्या (IMD)माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी किंवा रात्री दरम्यान 110 किमी प्रती तास वेगाच्या वाऱ्यासह तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला, विशेषतः काकीनाडा परिसरातून मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम यांच्या मधून जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला आणि कोकणाला देखील बसल्याचे दिसून येत आहे.
मोंथा चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळला आहे. अरबी समुद्र खवळला असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर
झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये मोंथा चक्रीवादळ धडकले आहे. कोकणातही सध्या समुद्रातला वातावरण बदललं असून जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत.
रात्री उशिरा किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला. सकाळपासून किनारपट्टी भागातलं वातावरण ढगाळ आहे. पुढील २४ तासात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणातले मच्छीमारी सध्या ठप्प झाली असून पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. किल्ले वाहतूक आणि समुद्री स्पोर्ट सध्या बंद ठेवण्यात आले आहेत.
‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
पूर्व मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे भारतीय लष्कराला हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि संबंधित राज्य सरकारांशी समन्वय साधून परिस्थिती कमी करणे हे उद्दिष्ट आहे.
चक्रीवादळ मोंथा २८ ऑक्टोबरपर्यंत तीव्र वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यानच्या किनाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्याचा परिणाम १५ जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे.
हे चक्रीवादळ ओडिशातील मलकानगिरीपासून अंदाजे २०० किमी अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १०० किमीपर्यंत पोहोचू शकतो. येणाऱ्या आपत्तीचा परिणाम १५ जिल्ह्यांवर होईल, त्यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.






