कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (D K shivakumar) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. डीके शिवकुमारचे लग्न उषा शिवकुमारशी यांच्याशी झाले आहे. त्यांना ऐश्वर्या आणि आभरणा या दोन मुली तर आकाश नावाचा मुलगाही आहे. वडिल यशस्वी राजकारणी असुन त्यांची मुलगी ऐश्वर्या शिवकुमारला ( Aishwarya Shivakumar) मात्र, राजकारणात रस नाही. शैक्षणिक क्षेत्राची आवड असलेली ऐश्वर्या ग्लोबल अकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजीची व्यवस्थापकीय संचालक आहे. श्रीमंत राजकारण्यांपैकी एक असलेल्या डीके शिवकुमार यांच्या कन्येबद्दल न माहित असलेल्या काही गोष्टी जाणून घ्या.
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांची मुलगी ऐश्वर्या शिवकुमार ऐश्वर्या ही अभियांत्रिकी पदवीधर आहे. सध्या ती ग्लोबल अॅकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजीचं संचालकद सांभाळते. डीके शिवकुमार मालकीचे हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. ऐश्वर्याने कॅफे कॉफी डेचे संस्थापक दिवंगत व्हीजी सिद्धार्थ यांचा मुलगा आणि भाजप नेते एसएम कृष्णा यांचा नातू अमर्त्य हेगडे यांच्यासोबत 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. अमर्त्यनेही वडिलांच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळतो. 19 नोव्हेंबर 2020 रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका खाजगी हॉटेलमध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. कोरोना काळातील नियमांमुळे शहरातील त्यावेळी मोजक्याच जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
कर्नाटकचे माजी मंत्री डीके शिवकुमार यांना 2019 सप्टेंबर मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ऐश्वर्याची मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात 7 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. 2013 च्या प्रतिज्ञापत्रात डीके शिवकुमार यांनी त्यांची मुलगी ऐश्वर्याची संपत्ती फक्त एक कोटींच्या जवळ दाखवली होती, जी 5 वर्षानंतर 100 कोटी झाली आहे, एवढेच नाही तर ऐश्वर्या एका शैक्षणिक ट्रस्टची ट्रस्टी देखील असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ही ट्रस्टची असलेली मालमत्ता आणि व्यवसाय ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले.
डीके शिवकुमार यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करताना, एजन्सीला त्यांच्या मुलीच्या ट्रस्टशी संबंधित कागदपत्रे सापडली होती, या ट्रस्टच्या कामकाजाचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळविण्यासाठी ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, सूत्रांच्या मते, ऐश्वर्याने काही वैयक्तिक आर्थिक कागदपत्रे देखील सादर करण्यात आली होती.






