Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाऊदच्या बातमीमुळे पाकिस्तानात खळबळ; सर्व इंटरनेट सेवा बंद; उज्ज्वल निकम यांची सूचक प्रतिक्रिया

  • By युवराज भगत
Updated On: Dec 18, 2023 | 12:57 PM
dawood ibrahim

dawood ibrahim

Follow Us
Close
Follow Us:

Dawood Ibrahim Hospitalised in Karachi : संपूर्ण देशाला हादरा देणाऱ्या मुबंईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा (1993 Mumbai Bomb Blast) मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) कराचीच्या (Karachi) रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची बातमी पाकिस्तानी मीडिया आणि पत्रकारांद्वारे पाकिस्तानमध्ये चालवली जात आहे. तसेच, पाकिस्तानच्या सोशल मीडियावर (Social Media) याची जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याविषयी आत्तापर्यंत अनेक बातम्या चर्चेत आल्या. त्यातल्या काही खऱ्या ठरल्या तर काही फक्त अफवा. यंदा मात्र थेट पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्या व पत्रकारांकडून दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचं खळबळजनक वृत्त देण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचंही सांगितलं जात असल्यामुळे दाऊद इब्राहिमची प्रकृती खरंच चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नेमकी भूमिका मांडली आहे.

काय घडतंय पाकिस्तानात?
भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर असणारा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे अनेक पुरावे भारत सरकारनं पाकिस्तान सरकारला दिले आहेत. मात्र, तरीदेखील दाऊद पाकिस्तानात नसल्याचाच जाप पाकिस्तानमधील सरकार, लष्कर करत राहिले. आता मात्र पाकिस्तानमध्येच दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं असून त्याला कराचीमधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दाऊदची स्थिती गंभीर असून यासंदर्भात पाकिस्तानकडून मात्र कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. टीव्ही ९ शी बोलताना उज्ज्वल निकम यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवलं आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?
उज्ज्वल निकम यांनी दाऊदची स्थिती गंभीर असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “फक्त सोशल मीडिया नाही, तर पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनीही ही बातमी चालवली आहे. त्याला आधार म्हणजे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. साधारणपणे पाकिस्तानात अंतर्गत यादवी सुरू असेल किंवा पाकिस्तानला जगापासून काही गोष्ट लपवायची असेल, तेव्हा पाकिस्तान संपूर्ण देशातली इंटरनेट सेवा बंद करते. भारतात असं कधी घडत नाही. पाकिस्तानमध्ये सध्या कोणतंही यादवी युद्ध चालू नाही. अमेरिकेकडूनही त्यासंदर्भात असा कोणताही खुलासा नाही”, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

पाकिस्तानची पंचाईत!
दरम्यान, दाऊदवरील विषप्रयोगाच्या वृत्तामुळे पाकिस्तानचीच पंचाईत झाल्याचं निकम म्हणाले आहेत. “आता पाकिस्तानची पंचाईत झाली आहे. कारण आतापर्यंत पाकिस्तानकडून परवेज मुशर्रफ यांच्यासह सगळ्यांनी मोठ्या ठामपणे सांगितलं होतं की दाऊद इब्राहिम आमच्याकडे राहात नाही. दाऊद मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटात वाँटेड गुन्हेगार आहे. मी हा खटला चालवला, तेव्हा दाऊदनं पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला, याचा पुरावा आम्ही न्यायालयात आरोपींची साक्ष घेऊन सादर केला. त्यामुळे आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून दाऊदला लपवण्यासाठी पाकिस्तान हे प्रयत्न करत आहे”, असं निकम म्हणाले. “पाकिस्तानची खरी गोची इथेच झालीये. कारण आता पाकिस्तान दाऊदवर भारतानं विषप्रयोग केला असा दावा करूच शकत नाही. कारण दाऊद पाकिस्तानच्या भूमीत नाही, ही अधिकृत भूमिका पाकिस्ताननं घेतली होती”, असंही ते म्हणाले.

Web Title: Dawoods poisoning caused a big stir due to pakistani media reports all internet services shut down in pakistan ujjwal nikams suggestive reaction nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2023 | 12:42 PM

Topics:  

  • dawood ibrahim

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.