भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचं महत्त्वाचं ट्विट; त्यात म्हटलं...
नवी दिल्ली : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. आता या हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत मध्यरात्रीच हल्ला केला. यावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विट करत ‘भारत माता की जय’ असे म्हटले आहे.
भारत सरकार आणि सुरक्षा दलांनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली होती. मात्र, लष्करी कारवाई कधी होणार अशी चर्चा सुरू होती. आज देशभरात 244 ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येणार होते. मात्र, ते करण्याआधीच भारताने एअर स्ट्राईक करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला भारतीय सैन्याने अशा वेळी केला जेव्हा भारत सरकारचा मॉक ड्रिल काही तासांत अनेक ठिकाणी सुरू होणार होता. युद्धासारख्या आणीबाणीला तोंड देण्याची तयारी म्हणून आयोजित केलेला हा मॉक ड्रिल राष्ट्रीय पातळीवर पूर्वनियोजित होता.
काय आहे ‘ऑपरेशन सिंदूर’?
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. हा हल्ला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होता, ज्यामध्ये 26 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कराच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले होते की, ‘न्याय झाला आहे.’ जय हिंद!’ या कारवाईने जगाला दाखवून दिले की भारत दहशतवादाविरुद्ध गप्प बसणार नाही.
भारत माता की जय!
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 6, 2025
लष्कराकडून 10 वाजता दिली जाणार माहिती
भारतीय लष्कर बुधवारी सकाळी 10 वाजता ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
सरकारने हे सिद्ध केले आहे की ‘ते जे काही बोलतात ते पूर्ण होतं’
जम्मू आणि काश्मीर जद(यू) चे अध्यक्ष जीएम शाहीन म्हणाले, “योग्य वेळी घेतलेला हा योग्य निर्णय होता. योग्य ठिकाणी हल्ले करण्यात आले. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले. देश ‘ऑपरेशन सिंदूर’ साजरा करेल. सरकारने सिद्ध केले आहे की, ते जे बोलतात ते ते पूर्ण करतात. मी केंद्र सरकार, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करतो.”
जय हिंद 🇮🇳
भारत माता की जय ! pic.twitter.com/vNgDhYw5Nk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 6, 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून याावर प्रतिक्रिया दिली. ‘जय हिंद, भारत माता की जय’ ! असे त्यांनी म्हटले आहे.