Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या कामगारांकडे दिवाळीआधीच आली लक्ष्मी; नवनियुक्त CM आतिशी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिल्लीमध्ये सध्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्या निर्णायाची चर्चा सुरु आहे. आतिशी मार्लेना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दमदार कामाला सुरुवात केली आहे. आतिशी मार्लेना यांनी कामगारांमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला असून यामुळे कामगारांच्या वेतनामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. आप सरकारने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 26, 2024 | 01:32 PM
दिल्लीच्या कामगारांकडे दिवाळीआधीच आली लक्ष्मी; नवनियुक्त CM आतिशी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  दिल्लीच्या राजकारणाची चर्चा सध्या देशभर रंगली आहे. आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. नवनियुक्त आतिशी मार्लेना यांनी आपल्या निर्णयाने वेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. आतिशी मार्लेना यांच्या नेतृत्वातील दिल्लीच्या आप सरकारने कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णायामुळे कामगारांच्या वेतनामध्ये बदल होणार असून त्यामुळे कामगार वर्गांमध्ये एकच आनंदोत्सव होत आहे. अतिशींच्या या निर्णयामुळे कामगारांकडे एक महिना आधीच दिवाळी आली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी बुधवारी काही शासन निर्णय जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी कामगारांसाठी नवीन किमान वेतन दर जाहीर केले. यामध्ये अकुशल कामगारांसाठी 18,066 रुपये, अर्ध-कुशल कामगारांसाठी 19,929 रुपये आणि असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांसाठी 21,917 रुपये निर्धारित केले. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आतिशी मार्लेना यांनी कामगारांच्या वेतनासंदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णायाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत ही माहिती दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद असून या दिल्लीतील मजुरांसाठी किमान वेतनाच्या निर्णयाचे श्रेय आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले आहे.

AAP सरकार का ऐतिहासिक फैसला: दिल्ली में न्यूनतम मज़दूरी में वृद्धि‼️

अब न्यूनतम मज़दूरी इस प्रकार होगी👇
🔹अकुशल श्रमिक – ₹18,066
🔹अर्धकुशल श्रमिक – ₹19,929
🔹कुशल श्रमिक – ₹21,917

AAP सरकार का भारत निर्माताओं के जीवन को बेहतर बनाने की दिशा में क्रांतिकारी क़दम 🔥 pic.twitter.com/27NBfWFKEK

— AAP (@AamAadmiParty) September 25, 2024

मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर निशाणा साधला. भाजप पक्ष हा कामगारांच्या प्रगतीच्या विरोधात असल्याचे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. याबाबत बोलता मुख्यमंत्री आतिशी मार्लेना म्हणाल्या की, “आपल्या देशातील इतर राज्यापेक्षा जास्त किमान वेतन देण्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचे सरकार सर्वांत पुढे आहे. गरीब लोकांचे शोषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने किमान वेतन ऐतिहासिक पातळीवर वाढवले आहे. भाजपने नेहमीच गरीब विरोधी काम केले आहे आणि हे आपण दोन प्रकारे पाहू शकतो,” अशी टीका आतिशी मार्लेना यांनी केली.

भाजपशासित राज्यात दिल्लीच्या या नवीन कामगारांच्या किमान वेतनाच्या अर्धे वेतन दिले जात असल्याचा आरोप आतिशी मार्लेना यांनी केला आहे. त्यांनी कामगारांना उद्देशून सांगितले की, “मोफत वीज, पाणी आणि चांगले शिक्षण याशिवाय दिल्लीच्या आम आदमी पक्षाने ऐतिहासिक निर्णय घेऊन दिल्लीतील कामगारांचे किमान वेतन देशात सर्वाधिक केले आहे. येत्या चार महिन्यांत तुम्हाला सन्माननीय जीवन मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील.” पुढे आतिशी मार्लेना यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. त्या म्हणाल्या की, “अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने 2016 साली किमान वेतन वाढवण्याबाबत पहिल्यांदाच चर्चा केली, तेव्हा भाजपने आपल्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून आम्हाला रोखले. भाजप हे गरिबांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. भाजपने शेतकऱ्यांसाठी तीन काळे कायदे तयार केले. सिंधू सीमेवर शेतकरी बसले तेव्हा त्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हटले गेले. पण याने पंतप्रधान मोदी किंवा भाजप यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही,” असा घणाघात दिल्लीच्या नवीन पदभार स्वीकारलेल्या अतिशी मार्लेना यांनी भाजपवर केला आहे.

Web Title: Delhi aap cm atishi marlena announces minimum wage hike for workers in unorganised sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 01:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.