
Delhi Bomb Blast सुनियोजितच; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मिळाले धक्कादायक पुरावे; ड्रोन-रॉकेट अन्...
दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणी समोर आले अनेक पुरावे
एनआयए करत आहेत दिल्ली बॉम्ब स्फोटाची चौकशी
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झाला होता स्फोट
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील परिसरात एक भीषण स्फोट (Delhi Bomb Blast) झाला होता. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले आहे. याचा तपास एनआयए करत आहे. या घटनेतील आरोपी असलेल्या दहशतवादी दानीशकडून तपास यंत्रणेला अनेक महत्वाचे पुरावे संपलडे आहेत. यातून तो हमासचे टेक्निक वापरत होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणी तपास करत असताना दहशतवादी दानिशच्या मोबाईलमधून अनेक महत्वाचे पुरावे सापडले आहेत. त्याच्या फोनमधील हिस्ट्री डिलिट केली गेली आहे. त्याचा तपास केला असतं दानिश सातत्याने ड्रोन, रॉकेट यावार अभ्यास करत होता. तपास यंत्रणेला दानीशच्या मोबाइलमधून अनेक ड्रोन्सचे फोटो देखील सापडले आहेत.
त्यामध्ये हमास वापर असलेल्या ड्रोन्ससारखे काही फोटो देखील आढळून आले आहेत. या फोटोवरून दानिश खूप दिवसांपासून ही टेक्नॉलॉजी शिकत होता हे समोर आले आहे. ड्रोन्स अटॅकची तयार सुरू होती असे दानीशने मान्य केले आहे. 25 किमी अंतरावरून हल्ला होऊ शकेल असे ड्रोन्स तो तयार करत होता.
त्याच्या मोबाइलमधून ड्रोन्स, रॉकेट लॉंचर आणि अन्य स्फोटकाचे फोटो जप्त करण्यात आले आहेत. ही स्फोटके तयार करण्याचे तो प्रशिक्षण घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. काही विदेश नंबर देखील त्याच्याकडे आढळून आले आहेत. एनआयए याचा तपास करत आहे. यावरून दानिश मोठा हल्ला करण्याच्या तयारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.