Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi CM Attack News: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर प्राणघातल हल्ला; एकाला अटक

२० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 20, 2025 | 10:14 AM
Delhi CM Attack News: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर प्राणघातल हल्ला; एकाला अटक
Follow Us
Close
Follow Us:

Delhi CM Attack News: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात  आल्याची माहिती समोर आली आहे. सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा सर्व प्रकार घडला.  रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असतानाच एका व्यक्तीने त्यांना थप्पड मारली. पण काही क्षणातच रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता

यासंदर्भात बोलताना दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर म्हणाले की, “३५ वर्षीय एक व्यक्ती जनसुनावणीला आला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली. त्यानंतर काही वाद झाला. त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हताश झालेल्या पक्षाचा असू शकतो. २० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. रेखा दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत.

शैलेंद्र कुमार या प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, मी उत्तम नगरहून गटाराबद्दल तक्रार घेऊन आलो होतो. पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या गेटवर पोहोचताच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांना मारहाण झाल्याचे कळले, हे पूर्णपणे चुकीचे आहे. तर, जर दिल्लीचे मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाची काय स्थिती असेल? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यावर दिल्ली काँग्रेसचे प्रमुख देवेंद्र यादव म्हणाले की, “ही घटना दुर्दैवी आहे. रेखा गुप्ता संपूर्ण दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. अशा घटनांचा कितीही निषेध केला तरी पुरेसा नाही. या घटनेने महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पर्दाफाश केला आहे. जर दिल्लीचे मुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य माणूस किंवा महिला कशी सुरक्षित राहू शकते? असं यादव यांनी विचारलं आहे.

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवरही हल्ला

दरम्यान, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकत त्यांच्यावर हल्ला केला होता. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला जागीच मारहाण केली होती. केजरीवाल यांच्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव अशोक झा असे आहे. तो खानपूर डेपोमध्ये बस मार्शल म्हणून तैनात होता. केजरीवालांवर हल्ला केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. तथापि, त्यानंतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मार्च २०२२: गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कोणीतरी प्लास्टिकची बाटली फेकली होती. पण सुदैवाने बाटली केजरीवालांना लागली नाही. मागून फेकलेली बाटली त्यांच्या अंगावरून दुसऱ्या बाजूला गेली. ही घटना घडलेल्या ठिकाणी गर्दी होती, त्यामुळे बाटली फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.

Web Title: Delhi cm attack news deadly attack on delhi chief minister rekha gupta one arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • Rekha Gupta

संबंधित बातम्या

Rekha Gupta EVM Hacked : भाजप करतंय EVM मशीन हॅक? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली थेट कबुली, व्हिडिओ व्हायरल
1

Rekha Gupta EVM Hacked : भाजप करतंय EVM मशीन हॅक? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली थेट कबुली, व्हिडिओ व्हायरल

CM Relatives Official Meetings: नातेवाईक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात का, काय आहेत  नियम?
2

CM Relatives Official Meetings: नातेवाईक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात का, काय आहेत नियम?

Delhi CM Attack News : काहीतरी मोठं करण्याचा प्लॅन; रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचे गुजरात कनेक्शन आले समोर
3

Delhi CM Attack News : काहीतरी मोठं करण्याचा प्लॅन; रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचे गुजरात कनेक्शन आले समोर

Rekha Gupta News: हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा..; नेमकं झालं काय?
4

Rekha Gupta News: हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा..; नेमकं झालं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.