दिल्ली: केंद्र सरकारने सध्या देशातील घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक राज्यातून मोठ्या प्रमाणात बांग्लादेश घुसखोरांना पकडले जात आहे. दरम्यान दशाची राजधानी असलेल्या नवी दिली येथे देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 36 बांग्लादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या उत्तर पश्चिम जिलहहयातील युनिटने मोठी कारवाई करत 36 बांग्लादेशी घुसखोरांना अटक केली आहे. ज्यामध्ये 17 मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व नगरीक अवैधरीत्या भारतात वास्तव्य करत होते. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई भारत नगर भागात केली आहे.
दिल्ली पोलिसांनी घुसखोरांविरुद्ध एक मोठ ऑपरेशन राबवले आहे. पोलिसांनी या कारवाईतून 7 स्मार्टफोन आणि 13 बांग्लादेशी ओळखपत्रे जप्त केली आहेत. या स्मार्टफोन्समध्ये भारतात बंदी असलेले काही अप्लिकेशन सापडले आहेत.
Bangladeshi womens arrested: अवैधरित्या भारतात प्रवेश; पुणे आणि मुंबईतून तरूणी पोलिसांच्या ताब्यात
हरियाणामधून पळून आले होते बांग्लादेशी
अटक करण्यात आलेले बांग्लादेशी घुसखोर हे हरियाणा पोलिसांच्या भीतीने दिल्लीत पळून आले होते. मात्र त्यांना दिल्लीत पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात बांग्लादेशी घुसखोरांना अटक
कात्रज भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या घुसखोरांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. हलाल अश्रफ खान (वय ३३), सोहेल खोका शेख (वय ३२) आणि लामिया अल्ताफ हवालदार (वय ३२, तिघे मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कलमांन्वये आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खान, शेख, हवालदार यांनी पंधरा दिवसांपूर्वी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले.
पुण्यातील कात्रज भागात पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ बांगलादेशी घुसखोरांना पकडले
आंबेगावातील शनिनगर भागातील एका घरात ते राहत होते. याबाबतची माहिती आंबेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पथकाने कारवाई करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाइल संच आणि बांगलादेशी नागरिकत्वाचे ओळखपत्र जप्त केले आहे.
पुणे आणि मुंबईतून तरूणी पोलिसांच्या ताब्यात
बांगलादेशातून घुसखोरीकरून भारतात आलेल्या एका तरुणीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात पकडण्यात आले आहे. बंडगार्डन पोलिसांनी या तरुणीला पकडले असून, याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, आमतुली, जि. बोरगुना, बांगलादेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणीचे आहे. याबाबत पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.