
दिल्ली : रविवारी (दि.09) रोजी एनडीएने सरकार स्थापन करत मंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याची जोरदार चर्चा झाली. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्यावेळी मागून एक प्राणी जात असल्याची व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. यामुळे चर्चांना उधाण आले. अनेकांनी राष्ट्रपती भवनामध्ये बिबट्या असल्याच्या चर्चांना वेग आला. यानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
शपथविधीवेळी दुर्गादास उइके मंत्रीपदाची शपथ घेत असताना मागू प्राणी जात असल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये असलेला हा प्राणी जंगली असून बिबट्या असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर अनेकांनी भीती व्यक्त केली. हा प्राणी बिबट्या असल्याची शक्यता वर्तवली जात असून यावर ठोस उत्तर दिले गेले नव्हते. याची व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर अखेर दिल्ली पोलिसांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा प्राणी कोणता आहे ते स्पष्ट केले. तसेच यापासून कोणताही धोका नाही याबाबत आश्वस्त केले.
दिल्ली पोलिसांचे ट्वीट
Some media channels and social media handles are showing an animal image captured during the live telecast of oath taking ceremony held at the Rashtrapati Bhavan yesterday, claiming it to be a wild animal. — Delhi Police (@DelhiPolice) June 10, 2024
या व्हायरल व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांनी ऑफिशियल अकाऊंटवरुन याबाबत स्पष्टीकरण दिले. दिल्ली पोलिसांनी लिहिले की, “काही मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल काल राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान कॅप्चर केलेली प्राणी प्रतिमा दाखवत आहेत आणि तो वन्य प्राणी असल्याचा दावा करत आहेत. यात काही तथ्य नाही. हे खरे नाही. कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी सामान्य असून घरातील मांजर आहे. कृपया अशा फालतू अफवांना अजिबात पसरवू नका.” असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे.
Politicspedia ट्वीट
An animal was seen strolling back in the Rashtrapati Bhavan after MP Durga Das finished the paperwork Some say it was a LEOPARD while others call it some pet animal. Have a look ? pic.twitter.com/PKfun580PM — Politicspedia ( मोदी जी का परिवार ) (@Politicspedia23) June 10, 2024