Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhirendra Shastri on nathuram Godse: नथुराम गोडसे खुनी? धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया,महात्मा गांधींबाबत मोठं विधान

लपवण्यात काहीच अर्थ नाही, सत्य बोलण्यात काय अडचण आहे? ते कोणत्या पक्षाचे आहे हे महत्त्वाचे नाही. आम्ही कोणाच्याही बाजूने नाही. आम्ही साधू आहोत. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही. आम्ही सत्याचे उपासक आहोत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 15, 2025 | 04:30 PM
Dhirendra Shastri's big statement about Nathuram Godse, Mahatma Gandhi

Dhirendra Shastri's big statement about Nathuram Godse, Mahatma Gandhi

Follow Us
Close
Follow Us:

Dhirendra Shastri on nathuram Godse:  मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाटिपण्ण्याही होतात. अशातच अलीकडे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रीयेमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी धीरेंद्र शास्त्री यांना नथुराम गोडसे देशभक्त होते का, असा प्रश्न विचारला. यावर बोलताना शास्त्री म्हणाले की, “नथुराम देशभक्त आहे की नाही, लोकांचे स्वतःचे मत आहे. पण माझ्य मते, महात्मा गांधींनी देशासाठी जे काही केले ते अभूतपूर्व होते. मी त्यांचा खूप आदर करतो.”

यानंतर तर नथुराम खुनी आहे का? असा प्रश्न विचारला असता “कोणतीही शहानिशा न करता तुम्ही अशा कोणालाही मारू शकत नाही. जे चांगले आहे, वाईट आहे. त्यांना तुम्ही कायद्याच्या हातात सोपवले पाहिजे. संविधान याच कारणासाठी बनवले गेले आहे, असे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले. त्यानतंर तुमच्या मते स्वातंत्र्याचा नायक कोण आहे? शास्त्री म्हणाले, सुभाषचंद्र बोस. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याशिवाय भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद हे देखील भारताच्या स्वातंत्र्याचे नायक आहेत.

Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला

तुमच्या मते अशी कोणतीही महिला आहे का जी स्वातंत्र्य चळवळीची नायिका कोण आहे? या प्रश्नावर हसत हसत धीरेंद्र शास्त्री म्हणाले – अनेक महिला आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी असलेल्या सर्व महिलांचा आम्ही आदर करतो. असंही त्यांनी नमुद केलं. आपण रिल्स पाहता का, यावर बोलताना, कधीकधी पाहत असल्याचे शास्त्रींनी मान्य केले. तसेच मी खूप व्यस्त असल्याने आणि माझा वेळ बालाजींची सेवा करण्यात जात असल्याने मला मोबाईल फार वेळ वापरता येत नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सत्य बोलण्यात काय अडचण आहे?

जेव्हा देशात ऑपरेशन सिंदूरची चर्चा होती, तेव्हा राहुल गांधींनी असेही म्हटले की त्यांनी घरात घुसून हल्ला केला. खूप चांगले काम झाले. पण किती नुकसान झाले हे सांगण्यात सरकारला काय अडचण आहे? या प्रश्नावरही धीरेंद्र शास्त्रींनी उत्तर दिले. ते म्हणाले की, लपवण्यात काहीच अर्थ नाही, सत्य बोलण्यात काय अडचण आहे? ते कोणत्या पक्षाचे आहे हे महत्त्वाचे नाही. आम्ही कोणाच्याही बाजूने नाही. आम्ही साधू आहोत. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही. आम्ही सत्याचे उपासक आहोत. तसेच, आपल्याला बाहेरच्या दहशतवादापासून मुक्तता मिळेल. पण अंतर्गत दहशतवादापासून कधी मुक्तता मिळेल? आपल्याला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी काहीही अडचण नाही, आपण त्यांच्यावर कधीही क्षेपणास्त्रे डागू शकतो. पण आपण देशातील दहशतवाद्यांवर क्षेपणास्त्रे डागू शकत नाही. अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.

शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’; सार्वजनिक बांधकाम नव्हे तर पुणे महापालिकेवर जबाबदारी;

‘राष्ट्रवादाला महत्त्व दिले पाहिजे’

अंतर्गत दहशतवादी कोण?’ या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “आतील लोक तेच आहेत, ज्यांना देशाशी समस्या आहे. ते भारतात राहतात, खातात पण पाकिस्तानची गाणी गातात. काही लोक या ठिकाणाची गुप्तचर माहिती पाकिस्तानला पाठवतात. काहीजण नक्षलवाद, प्रादेशिकता, भाषिकता, समाजवाद आणि जातीयवादाच्या नावाखाली देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या मते राष्ट्रवादाला महत्त्व दिले पाहिजे,” असे शास्त्री म्हणाले.

 

 

Web Title: Dhirendra shastris big statement about nathuram godse mahatma gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 04:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.